Advertisement

ट्रकच्या धडकेनं कोसळला पुलाचा सांगाडा, २ जण गंभीर जखमी

घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील (Ghatkoper-Mankhurd Link Road) पादचारी पुलाला (FOB) ट्रकची (Truck) धडक लागल्यानं पादचारी पुलाचा सांगाडा कोसळल्याची (Collapse) धक्कादायक घटना घडली

ट्रकच्या धडकेनं कोसळला पुलाचा सांगाडा, २ जण गंभीर जखमी
SHARES

मुंबईतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील (Ghatkoper-Mankhurd Link Road) पादचारी पुलाला (FOB) ट्रकची (Truck) धडक लागल्यानं पादचारी पुलाचा सांगाडा कोसळल्याची (Collapse) धक्कादायक घटना घडली. गोवंडीजवळच्या (Govandi) बैंगनवाडी सिग्नलवर (Baiganwadi Signal) मध्यरात्रीच्या वेळी ही घटना घडली. हा पुलाचा सांगाडा पुलाखालील ४ गाड्यांवर पडल्यानं गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसानं झालं आहे. तसंच, या घटनेत २ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आलं आहे. 

हेही वाचा - महाराष्ट्राची एकजूट दाखवा, मुख्यमंत्र्यांचं सर्वपक्षीय खासदारांना आवाहन

पुलाचा सांगाडा कोसळ्यानं २ रिक्षा (Auto-rickshaw) आणि १ टेम्पोचं नुकसानं झालं आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिसानी धाव घेत पुलाचा मलबा हटवण्यचं काम तातडीनं हाती घेतलं. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - कोरोना व्हायरसचे ८ संशयित रुग्णालयात, मुंबई विमानतळावर ३९९७ प्रवाशांची तपासणी

बुधवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर सुरू असलेल्या महापालिकेच्या उड्डाण पुलाच्या कामासाठी एक ट्रक सिमेंटचा मोठा खांब (Large pillar of cement) घेऊन जात होता. या ट्रकची धडक पुलाखाली असलेल्या सांगाड्याला लागला. त्यामुळे हा सांगाडा थेट घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर (Ghatkoper-Mankhurd Link Road) कोसळला. त्यामुळं ट्रकचा चालक (Truck Driver) आणि एक इसम गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं.

हेही वाचा - मराठी शाळेत शिकले म्हणून नोकरी नाकारली, मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार

याप्रकरणी, वाहतूक पोलीस (Traffic Police), देवनार पोलीस (Devonar Police) आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी क्रेनच्या (Crain) सहाय्यानं हा लोखंडी सांगाडा बाजूला काढण्याचं काम हाती घेतलं. या घटनेनंतर घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती.



हेही वाचा -

CAA विरोधात भडकाऊ भाषण करणाऱ्या डॉ कफील खान यांना मुंबईतून अटक

ऑनलाईन काढता येणार बेस्ट बसची तिकीट



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा