Advertisement

महाराष्ट्राची एकजूट दाखवा, मुख्यमंत्र्यांचं सर्वपक्षीय खासदारांना आवाहन

केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी राज्य सरकारकडून लवकरच सर्वपक्षीय खासदारांची समिती नेमण्यात येणार आहे.

महाराष्ट्राची एकजूट दाखवा, मुख्यमंत्र्यांचं सर्वपक्षीय खासदारांना आवाहन
SHARES

केंद्र सरकारकडे प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी राज्य सरकारकडून लवकरच सर्वपक्षीय खासदारांची समिती नेमण्यात येणार आहे. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीत मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली.

राज्यातील प्रश्नांचा एकत्रित पाठपुरावा होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांची समिती असावी, अशी सूचना शरद पवार (sharad pawar) यांनी केली होती. त्यानुसार सह्याद्री अतिथीगृहात या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला जयंत पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, दादा भुसे, नवाब मलिक, अस्लम शेख, आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता इ. उपस्थित होते.

हेही वाचा- तोंड सांभाळून बोला, नाहीतर! ओवैसींना मनसेचा इशारा

या बैठकीत सर्वपक्षीय खासदारांनी महाराष्ट्रातील विविध प्रलंबित विषयांसंबंधीत मुद्दे मांडले आणि सूचनाही केल्या. या समितीच्या समन्वयकपदी खासदार अरविंद सावंत (arvind sawant) यांची नियुक्ती करण्याचा महत्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आला.

या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav thackeray) म्हणाले, पक्षीय भेदाभेद विसरून खासदारांनी महाराष्ट्राचं कुटुंब म्हणून दिल्लीत काम करावं, अशी अपेक्षा आहे. प्रलंबित प्रश्नांचा एकत्रित पाठपुरावा करण्यासाठी खासदारांची समिती गठीत नेमण्यात येईल. दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये (maharashtra sadan) समितीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, शिवाय महाराष्ट्राचे प्रश्न मांडताना विषयानुरूप टीम तयार करण्यात येईल. महाराष्ट्रातील विषयांवर खासदार संसदेत विचार मांडणार असताना सर्व खासदार संसदेत आवर्जून उपस्थित राहीले पाहिजेत.

मुख्यमंत्र्यांनी खासदारांना केलं आवाहन 

  • पूर व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईचा उर्वरित निधी मिळण्यासाठी पाठपुरावा करावा 
  • महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत सर्वपक्षीय खासदारांनी एकजूट दाखवावी
  • मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी एकत्रित पाठपुरावा करावा 
  • मुंबईतील रेल्वे, केंद्र शासनाच्या मोकळ्या जागा परवडणारी घरे बांधण्याकरीता द्याव्यात यासाठी प्रयत्न करावे
  • प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी राज्याला प्राधान्याने मिळावा यासाठी खासदारांनी प्रयत्न करावे

पुढील महिन्यात दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये (maharashtra sadan)  खासदारांची बैठक घेऊन प्रश्न सुटले की नाहीत याचा आढावा घेऊ. तसंच खासदारांनी या बैठकीत जे विविध मुद्दे मांडले, त्यावर राज्य शासनाच्या विविध विभागाच्या सचिवांची बैठक घेऊन ते मार्गी लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना यावेळी दिले.

हेही वाचा- अशोक चव्हाण चुकीचं बोलले- नवाब मलिक

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा