Advertisement

अशोक चव्हाण चुकीचं बोलले- नवाब मलिक

कुणी कुणाकडून काहीही लिहून घेतलेलं नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी सांगितलं.

अशोक चव्हाण चुकीचं बोलले- नवाब मलिक
SHARES

राज्यात महाविकास आघाडी सरकारची (maha vikas aghadi government) स्थापना ‘किमान समान कार्यक्रमा’च्या (common minimum programme) आधारे झाली आहे. शिवसेना (shiv sena), राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि काँग्रेस (congress) अशा तिन्ही पक्षांनी एकमताने या कार्यक्रमाच्या विषयांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. कुणी कुणाकडून काहीही लिहून घेतलेलं नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (nawab malik) यांनी सांगितलं.

नांदेडमधील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी महाविकास आघाडी सरकारमधील (maha vikas aghadi government) भागीदार असलेल्या शिवसेनेबाबत (shiv sena) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. सिनेमा, नाटक आणि राजकारण सारखेच आहेत. तीन पक्ष एकत्र येऊन सरकार बनवू असं वाटलं नव्हतं. पण हल्ली मल्टीस्टारर सिनेमांचा जमाना आहे. त्यामुळे आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन सरकार बनवलं. 

हेही वाचा- काँग्रेसला काहीही लिहून दिलेलं नाही, शिवसेनेचा खुलासा

तीन वेगळ्या विचारांच्या पक्षांचं सरकार सत्तेत आल्यावर भांडणं होतात, हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांना ठाऊक होतं, त्यामुळे ते या आघाडीसाठी तयार नव्हत्या. परंतु चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर आम्ही त्यांना आश्वस्त केलं. त्यासाठी महाआघाडीत येताना घटनेनुसारच काम करण्याचं आश्वासन आम्ही शिवसेनेकडून (shiv sena) लिहून घेतलं. सोबतच शिवसेनेने घटनाबाह्य काम केल्यास या सरकारमध्ये राहणार नाही, असं स्पष्टपणे शिवसेनेला सांगितलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनेच्या चौकटीतच राहून कामं करतील, असं अशोक चव्हाण (ashok chavan) म्हणाले होते.

त्यावर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शिवसेनेने (shiv sena) काँग्रेसला (congress) काहीही लिहून दिलेलं नाही. राज्य सरकार हे राज्यघटनेने घालून दिलेल्या तत्वांनुसारच काम करत असतं. त्यामुळे कुणाला काहीही लिहून देण्याचा प्रश्नच नाही. अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी कुठल्या संदर्भात हे विधान केलं ते ठाऊक नाही. 

हेही वाचा- तोंड सांभाळून बोला, नाहीतर! ओवैसींना मनसेचा इशारा

तर, नवाब मलिक (nawab malik) म्हणाले, हे सरकार बनवण्यासाठी दिल्ली आणि मुंबईत तिन्ही पक्षांच्या अनेक बैठका झाल्या. तिन्ही पक्षांचं एकमत होईल, असा किमान समान कार्यक्रम (common minimum programme) आखण्यात आला. त्यावर तिन्ही पक्षांनी सह्या केल्या. त्यामुळे हे सरकार किमान समान कार्यक्रमाप्रमाणेच आणि घटनेच्या चौकटीत राहूनच चालणार आहे. त्यासाठी कुणी कुणाला वेगळं काहीही लिहून दिलेलं नाही. तिन्ही पक्ष एकमेकांचा मान राखूनच काम करतील.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा