Advertisement

काँग्रेसला काहीही लिहून दिलेलं नाही, शिवसेनेचा खुलासा

अशोक चव्हाण (pwd minister ashok chavan) यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद शमतो न शमतो तोच शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी त्यांना प्रतिउत्तर दिल्यामुळे पुन्हा या वादाकडे सर्वांचं लक्षं वेधलं गेलं आहे.

काँग्रेसला काहीही लिहून दिलेलं नाही, शिवसेनेचा खुलासा
SHARES

दररोज कुठल्या ना कुठल्या विषयावरून महाविकास आघाडी सरकारच्या (maha vikas aghadi) नेत्यांमधील विसंवाद सुरूच आहे. काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (pwd minister ashok chavan) यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद शमतो न शमतो तोच शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी त्यांना प्रतिउत्तर दिल्यामुळे पुन्हा या वादाकडे सर्वांचं लक्षं वेधलं गेलं आहे.

हेही वाचा- तोंड सांभाळून बोला, नाहीतर! ओवैसींना मनसेचा इशारा

तीन वेगळ्या विचारांचं सरकार सत्तेत आल्यावर भांडणं होतात, हे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांना ठाऊक होतं, त्यामुळे ते या आघाडीसाठी तयार नव्हत्या. परंतु चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्यानंतर आम्ही त्यांना आश्वस्त केलं. त्यासाठी महाआघाडीत येताना घटनेनुसारच काम करण्याचं आश्वासन आम्ही शिवसेनेकडून (shiv sena) लिहून घेतलं. तरीही शिवसेनेने घटनाबाह्य काम केल्यास आघाडीत राहणार नाही, असा इशारा अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी नांदेड इथल्या सभेत दिला होता. 

त्यावर प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी चव्हाण असं का म्हणाले हे ठाऊक नाही, असं म्हणत हा विषय टाळण्याचा प्रयत्न केला.

पण एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी मात्र त्याला उत्तर दिलं, शिवसेनेने (shiv sena) काँग्रेसला (congress) काहीही लिहून दिलेलं नाही. राज्य सरकार हे राज्यघटनेने घालून दिलेल्या तत्वांनुसारच काम करत असतं. त्यामुळे कुणाला काहीही लिहून देण्याचा प्रश्नच नाही. अशोक चव्हाण (ashok chavan) यांनी कुठल्या संदर्भात हे विधान केलं ते ठाऊक नाही, असंही शिंदे म्हणाले. 

हेही वाचा- भीमा-कोरेगाव हिंसाचार: तपास ‘एनआयए’कडे सोपवण्यामागे षडयंत्र, काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरोप

याआधीही चव्हाण यांनी वादग्रस्त वक्तव्य करत खळबळ उडवून दिली होती. मुस्लिमांनी (muslims) आग्रह केल्यामुळेच काँग्रेस या आघाडीत सामील झाल्याचं चव्हाण म्हणाले होते.   

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा