CAA विरोधात भडकाऊ भाषण करणाऱ्या डॉ कफील खान यांना मुंबईतून अटक

दाढी ठेवणारे लोक हे दहशतवादी असतात असे RSS शाळांमध्ये शिकवले जाते, असा आरोप यावेळी खान यांनी केला

CAA विरोधात भडकाऊ भाषण करणाऱ्या डॉ कफील खान यांना मुंबईतून अटक
SHARES

देशभरात सीसीए आणि एनआरसी विरोधात ठिक ठिकाणी आंदोलनकरून त्याला विरोध सुरू असताना. अलिगड मुस्लिम विद्यापीठात विद्यार्थ्यांसमोर भडकाऊ भाषण करणाऱ्या डॉ कफील खान मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. बीआरडी कॉलेजमध्ये बाल मृत्यूच्या प्रकरणात २०१७ मध्ये कफील खान यांना निलंबित करण्यात आले होते.

हेही वाचाः- केंद्राच्या एनआयए संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ – गृहमंत्री 

उत्तरप्रदेशातील अलिगड मुस्लिम विद्यापीठात डॉ कफील खान हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी १२ डिसेंबर २०१९ रोजी आले होते. त्यावेळी त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये चुकीचे मार्गदर्शनकरत भडकाऊ भाषण केले. या घटनेची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेशमधील स्पेशल टास्क फोर्स त्यांच्या मागावर होते. विद्यार्थ्यांना संबोधित करताना खान यांनी 'मोटाभाई' सर्वांनाच हिंदू किंवा मुस्लिम होण्यासाठी शिकवले आहे पण ते मनुष्य बनू नका असे शिकवत आहेत. ते पुढे म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अस्तित्व असल्याने त्यांना घटनेवर विश्वास नाही. खान म्हणाले की, सीएए मुसलमानांना द्वितीय श्रेणीचे नागरिक बनवते आणि एनआरसी लागू होताच लोकांना त्रास दिला जाईल. ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. ती आपल्याला लढावीच लागेल. दाढी ठेवणारे लोक हे दहशतवादी असतात असे RSS शाळांमध्ये शिकवले जाते, असा आरोप यावेळी खान यांनी केला

हेही वाचाः- भीमा-कोरेगाव तपाससंबधी सरकार संभ्रमात- प्रकाश आंबेडकर

CAA कायदा लागू करून सरकारला सिद्ध करायचे आहे की भारत हा एक देश नाही आहे. अशा भाषणामुळे खान यांनी शांती भंग केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात १५३-ए  भा.द.वि कलमांतर्गत सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता. डाँ कफिल खान हे मुंबई विमानतळावरून प्रवास करण्यापूर्वीच उत्तर प्रदेशच्या स्पेशल टास्क फोर्सने त्यांना अटक केली आहे. महत्त्वाचे म्हणजे खान बीआरडी कॉलेजमध्ये बाल मृत्यूच्या प्रकरणात २०१७ मध्ये कफील खान यांना निलंबित करण्यात आले होते.

हेही वाचाः- जनगणनेसाठी शिक्षकांच्या 'मे' मधील सुट्टय़ा रद्द


Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा