Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

जनगणनेसाठी शिक्षकांच्या 'मे' मधील सुट्टय़ा रद्द

वर्षातील ७६ पैकी तब्बल ३९ सुट्टय़ांना शिक्षकांना मुकावे लागणार आहे.

जनगणनेसाठी शिक्षकांच्या 'मे' मधील सुट्टय़ा रद्द
SHARES

जणगणनेसाठी मोठय़ा संख्येने शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या मे महिन्यातील सुट्टय़ा रद्द केल्या जाणार आहेत. जनगणना अधिकार्‍यांनी शिक्षणाधिकार्‍यांना तशा नोटीस पाठवल्या आहेत. त्यामुळे राज्यातील शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने निषेध केला आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा, अशी मागणी परिषदेनं केली आहे.

हेही वाचाः- केंद्राच्या एनआयए संदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ – गृहमंत्री

२०२१मध्ये जनगणना करण्यात येणार आहे. १ मे २०२० ते १५ जून २०२० या कालावधीत जनगणनेचा पहिला टप्पा सुरू होणार आहे. यात घरांना क्रमांक देणे, गटाची विभागणी, घर यादी तयार करणे आदी कामे करण्यात येतील. त्यासाठी शिक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यासाठी त्यांच्या रजा रद्द केल्या जाणार आहेत. मे महिन्यातील सुट्टय़ा रद्द करण्यात येणार आहेत. त्यामुळे वर्षातील ७६ पैकी तब्बल ३९ सुट्टय़ांना शिक्षकांना मुकावे लागणार आहे. जणगणनेच्या कामासाठी  शिक्षकांच्या सुट्या रद्द करण्यात  येण्याच्या जनगणना अधिकाऱ्यांच्या निर्णयामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमध्ये तीव्र नाराजी आहे. राज्यातील शिक्षकांनी या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांनी या निर्णयाचा निषेध नोंदवत हा निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

हेही वाचाः-मुंबईच्या कमाल तापमानात घट


काय आहे नोटिशीत?

जनगणनेच्या कामासाठी शिक्षकांच्या नेमणुका करण्यात येणार आहेत. पहिला टप्पा हा १ मे ते १५ जून २०२० मध्ये सुरू होणार आहे. या कालावधीत अनेक कामे करावी लागणार आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या सुट्टय़ा रद्द करण्यात येणार आहेत. महापालिका, खासगी शाळांमधील शिक्षक आणि मुख्याध्यापकांना मुख्यालय सोडून जाऊ नये, अशा सूचना या नोटिशीद्वारे देण्यात आल्या आहेत. मुख्यालय सोडून गेल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. कोणत्याही कामासाठी शिक्षकच का नेमावे लागत आहेत. त्यांच्या सुट्टय़ांवर गदा का आणली जाते. इतर कर्मचार्‍यांकडे हे काम का सोपवले जात नाही. आम्ही जनगणना अधिकार्‍यांची भेट घेऊन शिक्षकांच्या सुट्टय़ा रद्द करू नयेत, अशी मागणी केली जाईल. त्या कालावधीत त्यांना कुटुंबासोबत बाहेर जावे लागते. तसेच काही शिक्षकांना बोर्डाचे पेपर तपासण्याची कामेही दिली जातात, असे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे मुंबईतील कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले

हेही वाचाः- आजपासून धावणार मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा