Advertisement

मुंबईच्या कमाल तापमानात घट

मुंबईच्या कमाल तापमानामध्ये मंगळवारपेक्षा सुमारे ३ अंशांनी घट झाली

मुंबईच्या कमाल तापमानात घट
SHARES

जानेवारी महिन्याच्या सुरूवातीच्या आठवड्यात मुंबईसह अनेक ठिकाणी गारवा (Cold) वाढला. परंतु, काही दिवसांत पुन्हा मुंबईकरांना उकाड्याला सामोरं जावं लागलं. या गरम व थंड वातावरणामुळं अनेकांना साथीच्या आजारांना बळी पडावं लागलं. मात्र, गेल्या आठवड्यात उकाडा अनुभवल्यानंतर बुधवारी दिवसभर गार वारे मुंबईकरांनी अनुभवलं. संध्याकाळच्या वेळी या गारठ्याचा प्रभाव अधिक जाणवला. 

वायव्येकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळं सध्या बुधवारी कमाल तापमानावर (maximum temperature) परिणाम केला. मुंबईच्या कमाल तापमानामध्ये मंगळवारपेक्षा सुमारे ३ अंशांनी घट झाली. मुंबईचं कमाल तापमान (Temperature) सांताक्रूझ (Santacruz) इथं बुधवारी २६.८ अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं तर, कुलाबा (Colaba) इथं हे तापमान २६.५ अंश सेल्सिअस होतं.

हेही वाचा - मराठी शाळेत शिकले म्हणून नोकरी नाकारली, मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार

मुंबईसह राज्यभरात कमाल तापमानात बुधवारी घट आढळून आली. त्यामुळं मुंबईसह उपनगरात थड वातावरणामुळं मुंबईकरांना गरम कपडे घालणं पसंत केलं. सरासरीपेक्षा राज्यभरातच पारा घसरलेला. महाबळेश्वर (Mahabaleshwar) इथं सरासरी आणि बुधवारच्या तापमानात ६ अंशाचा फरक होता.

हेही वाचा - आयआयटी मुंबईचा विद्यार्थ्यांना इशारा, परवानगीशिवाय लावता येणार नाहीत पोस्टर, पॅम्प्लेट

कोकण (Kokan) विभागातही कमाल आणि सरासरी तपामनात मोठी तफावत झाली. सांताक्रूझ इथं सरासरीपेक्षा ४.५ अंशांचा तर कुलाबा इथं ३.५ अंशांचा फरक बुधवारच्या तापमानात होता. मुंबईचं किमान तापमान मात्र, बुधवारी फारसे खाली उतरलं नाही. सांताक्रूझ (Santacruz) इथं १९.४ तर कुलाबा इथं २०.० अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं. हे तापमान गुरुवारी आणखी खाली उतरण्याची शक्यता आहे.



हेही वाचा -

आजपासून धावणार मध्य रेल्वेची पहिली एसी लोकल

इंदिरा गांधींनी लोकशाहीचा गळा घोटला होता, जितेंद्र आव्हाड यांचे वादग्रस्त वक्तव्य



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा