Advertisement

मुंबईत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वाढ

गेल्या महिनाभरात तब्बल 378 तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबईत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचे सांगण्यात आले.

मुंबईत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वाढ
SHARES

मुंबईत (mumbai) भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. सोसायटी समोरच खाद्य दिले, कुत्रा अंगावर धावून आला, इमारती समोरच घाण केली, कुत्र्याला दगड मारला, अशा तक्रारींचा पाऊस देवनार पशुवधगृहाकडे प्राप्त होत आहेत.

गेल्या महिनाभरात तब्बल 378 तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबईत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याचे सांगण्यात आले.

राज्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहानांपासून मोठ्यांवर भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.

मुंबईत (mumbai) भटक्या कुत्र्यांची (stray dogs) संख्या 95 हजारांच्या आसपास आहे. भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या मुंबई महापालिकेसह (brihanmumbai municipal corporation) मुंबईकरांच्या डोक्याला त्रासदायक ठरत आहे.

मुंबईत भटक्या कुत्र्यांची दहशत असून रात्री तर दूर सकाळी रस्त्यावर ये-जा करत असताना भटके कुत्रे अंगावर धावून येतात. दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे लागल्यावर दुचाकीस्वारांच्या अपघाताची शक्यता जास्त असतात.

मुंबईसह राज्यात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. लहान मुलांसह मोठ्यांचा चावा घेण्याचे प्रमाण वाढले आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात अनेकांना जीवाला मुकावे लागले आहे.

सर्वोच्च न्यायालयात (supreme court) दाखल याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायालयाने राज्यातील (maharashtra) भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर अनेकदा तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबईत भटक्या कुत्र्यांची दहशत असून सोसायटी परिसरात खाद्य घालण्यावरून लोकांमध्ये भांडण होतात. भटक्या कुत्र्यांचा उपद्रवामुळे लोकांमध्ये संताप असून विविध कारणावरून लोक तक्रारी करत आहेत.

जून महिन्यात तब्बल 378 तक्रारी प्राप्त झाल्या असून 273 तक्रारींचे निवारण करण्यात आल्याचे मुंबई महापालिकेच्या देवनार पशुवधगृहाकडून सांगण्यात आले.



हेही वाचा

मानखुर्द मध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात

मुंबईतील कामा रुग्णालयात 1 ऑगस्टपासून 24x7 'वन स्टॉप सेंटर'

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा