Advertisement

मानखुर्द मध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात

वाहतूक पोलीस आणि पालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अडथळा दूर करून वाहनांचा प्रवाह पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले.

मानखुर्द मध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात
SHARES

सोमवारी सकाळी मुंबईतील (mumbai) मानखुर्दजवळ (mankhurd) एक बेस्ट बस (best bus) रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्याने, वाशीकडे जाणाऱ्या सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.

या अपघातामुळे (accident) या वर्दळीच्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. घटनास्थळावरील दृश्यांमध्ये बस दुभाजकाला लागून अडकल्याचे आणि एक संपूर्ण मार्गिका अडवल्याचे दिसत होते.

प्राथमिक माहितीनुसार, बस डिव्हायडरला धडकल्याने उत्तरेकडील मार्ग अंशतः बंद झाला. या घटनेत 2  जण जखमी झाले आहेत. तसेच एकाचा मृत्यू झाला आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल केले आहे.

रस्त्याच्या डिव्हायडरवर उभे असणारे भास्कर रावसाहेब पांडे (65) यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच जखमींमध्ये बसचे कंडक्टर वैभव वाघमारे (41 वर्षे), बसचे चालक श्रीराम शर्मा (51 वर्षे) यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.  

वाहतूक पोलीस आणि पालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अडथळा दूर करून वाहनांचा प्रवाह पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले.

सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास जारी केलेल्या अद्ययावत माहितीनुसार, मुंबई वाहतूक पोलिसांनी सांगितले की, "बेस्ट बस अपघातामुळे मानखुर्द मेट्रो स्टेशनच्या खाली उत्तर दिशेकडील वाहतूक मंदावली आहे." वाहनचालकांना विलंबाची शक्यता लक्षात घेऊन शक्य असेल तिथे पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.



हेही वाचा

मुंबईतील कामा रुग्णालयात 1 ऑगस्टपासून 24x7 'वन स्टॉप सेंटर'

कांदिवलीत मुंबईचे नवे रेल्वे टर्मिनस अडचणीत

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा