Advertisement

हे सरकार नक्की चालवतंय कोण? भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल

नक्की हे सरकार चालवतंय कोण? असा प्रश्न विचारत भाजपने (bjp) मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे.

हे सरकार नक्की चालवतंय कोण? भाजपचा मुख्यमंत्र्यांना सवाल
SHARES

मुस्लिम आरक्षणाचा (Muslim reservation) प्रस्तावच माझ्यासमोर अजून आलेला नाही, तेव्हा उगाच आदळआपट कशासाठी? असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर नक्की हे सरकार चालवतंय कोण? असा प्रश्न विचारत भाजपने (bjp) मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. 

मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात ५ टक्के आरक्षण (Muslim reservation) देण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (ncp mla nawab malik) यांनी विधान परिषदेत केली होती. त्यानंतर मुस्लिम आरक्षणामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहोचेल. यावर शिवसेनेची भूमिका काय असे प्रश्न भाजपकडून उपस्थित करण्यात आले होते. 

हेही वाचा- मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीने साथ सोडल्यास शिवसेनेला पाठिंबा देऊ- मुनगंटीवार

महाविकास आघाडी सरकारने (maha vikas aghadi) १०० दिवस पूर्ण केल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी विधान भवनात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना मुस्लिम आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारल्यावर सध्या असा कुठलाच प्रस्ताव माझ्यासमोर आलेला नाही. त्यामुळे कुणाला आधीच आदळआपट करण्याची गरज नाही. जेव्हा असा प्रस्ताव सरकारसमोर येईल, तेव्हा निकष तपासून सर्वसहमतीने योग्य तो निर्णय घेतला जाईल. मुद्दाच समोर नसल्याने शिवसेनेनं (shiv sena) यावर अद्याप कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे कोणीही आपली शक्ती वाया घालवू नये. जेव्हा हा मुद्दा समोर येईल, तेव्हा ही शक्ती वापरावी, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावलं होतं.

पण मुख्यमंत्र्यांच्या खुलाशानंतर मुस्लिम आरक्षणावर (Muslim reservation) महाविकास आघाडीत एकवाक्यता नसल्याचंही दिसून आलं. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (ncp), काँग्रेस (congress) आणि शिवसेनेत (shiv sena) खडाजंगी होण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यावर निशाणा साधताना भाजपने सामनातील बातमी ट्विट करत उद्धव ठाकरे यांना सवाल केला आहे. या फोटो मुस्लिमांना शिक्षणात ५ टक्के आरक्षण, राज्य सरकारचा निर्णय असा एक फोटो तर दुसऱ्या फोटोत मुख्यमंत्र्यांनी नुकतंच केलेलं वक्तव्य देण्यात आलं आहे.  

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे मंत्री मुख्यमंत्र्यांना न विचारताच निर्णय घोषित करतात, असा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेने घ्यायचा का? नक्की हे सरकार चालवतंय कोण? असा प्रश्नही भाजपने ट्विटर हँडलवरुन विचारला. 

हेही वाचा- मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाच समोर नाही, तर उगाच आदळआपट कशाला? - उद्धव ठाकरे

तर, दुसऱ्या बाजूला मुस्लिम आरक्षणाच्या (Muslim reservation) मुद्द्यावर शिवसेनेवर (Muslim reservation) दबाव टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी दिल्यास भाजपला शिवसेनेला सत्तेत राहण्यासाठी पाठिंबा देईल, असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा