Advertisement

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीने साथ सोडल्यास शिवसेनेला पाठिंबा देऊ- मुनगंटीवार

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर शिवसेनेवर दबाव टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी दिल्यास भाजपला शिवसेनेला सत्तेत राहण्यासाठी पाठिंबा देईल, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीने साथ सोडल्यास शिवसेनेला पाठिंबा देऊ- मुनगंटीवार
SHARES

मुस्लिम आरक्षणाच्या (Muslim reservation) मुद्द्यावर शिवसेनेवर (shiv sena) दबाव टाकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी दिल्यास भाजपला शिवसेनेला सत्तेत राहण्यासाठी पाठिंबा देईल, असं वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांनी केलं आहे.

हेही वाचा- मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाच समोर नाही, तर उगाच आदळआपट कशाला? - उद्धव ठाकरे

महाविकास आघाडी सरकारने (maha vikas aghadi) १०० दिवस पूर्ण केल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी विधान भवनात पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना मुस्लिम आरक्षणासंदर्भात प्रश्न विचारल्यावर सध्या असा कुठलाच प्रस्ताव माझ्यासमोर आलेला नाही. त्यामुळे कुणाला आधीच आदळआपट करण्याची गरज नाही. जेव्हा असा प्रस्ताव सरकारसमोर येईल, तेव्हा निकष तपासून सर्वसहमतीने योग्य तो निर्णय घेतला जाईल. मुद्दाच समोर नसल्याने शिवसेनेनं (shiv sena) यावर अद्याप कुठलीही भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे कोणीही आपली शक्ती वाया घालवू नये. जेव्हा हा मुद्दा समोर येईल, तेव्हा ही शक्ती वापरावी, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

त्याआधी मुस्लिम समाजाला नोकरी आणि शिक्षणात ५ टक्के आरक्षण (Muslim reservation) देण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याची घोषणा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (ncp mla nawab malik) यांनी विधान परिषदेत केली होती. त्यानंतर मुस्लिम आरक्षणामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला धक्का पोहोचेल. यावर शिवसेनेची भूमिका काय असे प्रश्न भाजपकडून उपस्थित करण्यात आले होते. 

हेही वाचा- मुस्लिम आरक्षणासाठी अध्यादेश काढणार- नवाब मलिक

मुस्लिम आरक्षणावरून (Muslim reservation) महाविकास आघाडीमध्ये (maha vikas aghadi) एकवाक्यता नसल्याने मतभेद होण्याची शक्यता वर्तवण्यात आहे. त्यावर भाष्य करताना सुधीर मुनगंटीवार (bjp mla sudhir mungantiwar) म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. आरक्षण हे धर्माच्या आधारावर देण्यात येऊ नये. धर्माच्या आधारेच आरक्षण द्यायचं झालं तर शिखांनी काय चूक केली? असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारने आधीच सवर्णांसाठी १० टक्के आरक्षण दिलं आहे. त्यात मुस्लीम देखील येतात. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य आहे. मुस्लिम आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेत शिवसेनेची (shiv sena) साथ सोडली तरी शिवसेनेने (shiv sena) चिंता करू नये, आम्ही त्यांना सत्ता टिकवण्यासाठी साथ द्यायला तयार आहोत, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा