Advertisement

भाजपकडून आठवले, उदयनराजेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

भाजपने रामदास आठवले (rpi ramdas athawale) यांची राज्यसभेची उमेदवारी कायम ठेवली असून लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून पराभूत झालेले भाजपचे नेते उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपकडून आठवले, उदयनराजेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर
SHARES

भाजपने राज्यसभेच्या उमेदवारांची बुधवारी घोषणा केली. यामध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात दाखल झालेले मध्य प्रदेशातील मातब्बर नेते ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत रिपाइं (आ) चे प्रमुख रामदास आठवले (rpi ramdas athawale) आणि भाजप नेते उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांचा समावेश आहे.

हेही वाचा- मनसेच्या शॅडो कॅबिनेटचं पवारांकडून कौतुक, म्हणाले...

महाराष्ट्रातून राज्यसभेच्या (maharashtra vidhan sabha) ७ जागा रिक्त होत आहेत. यामध्ये शरद पवार यांच्यासोबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई, शिवसेनेचे खा. राजकुमार धूत, भाजपचे खा. अमर साबळे, भाजपने पाठिंबा दिलेले अपक्ष खा. संजय काकडे, राष्ट्रवादीचे खा. माजिद मेनन यांचा समावेश आहे. या सदस्यांचा कार्यकाळ २ एप्रिल रोजी संपत आहे. 

यातून भाजपने रामदास आठवले (rpi ramdas athawale) यांची राज्यसभेची उमेदवारी कायम ठेवली असून लोकसभा निवडणुकीत साताऱ्यातून पराभूत झालेले भाजपचे नेते उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांना उमेदवारी दिली आहे. भोसले यांच्यामुळे संजय काकडे यांची उमेदवारी धोक्यात आल्याचं म्हटलं जात आहे. 

भाजपाने बुधवारी ९ राज्यांमधील राज्यसभा उमेदवारांची नावं जाहीर केली. यामध्ये असाम (भुवनेश्वर कालीता), बिहार (विवेक ठाकूर), गुजरात (अभय भारद्वाज, रमीलाबेन बारा), झारखंड (दीपक प्रकाश), मणिपूर (लिएसेंबा महाराजा), मध्य प्रदेश (ज्योतिरादित्य शिंदे, हर्ष सिंह चौहान), महाराष्ट्रातून (उदयनराजे भोसले, रामदास आठवले), राजस्थान (राजेंद्र गहलोत) यांचा समावेश आहे.

हेही वाचा- सरकारच्या मेगाभरतीला रोहित पवारांचा आक्षेप

दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (ncp chief sharad pawar) यांनी बुधवारी विधान भवनात जाऊन राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरला. महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांपैकी २ जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवत असून शिवसेना आणि काँग्रेस प्रत्येकी १ जागा लढवत आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा