Advertisement

coronavirus update: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णाची संख्या १५ वर

पुण्यात कोरोना व्हायरसची (coronavirus) लागण झालेले आणखी १ रुग्ण आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाची लागण झालेले ३ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा १५ वर पोहोचला आहे.

coronavirus update: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णाची संख्या १५ वर
SHARES

पुण्यात कोरोना व्हायरसची (coronavirus) लागण झालेले आणखी १ रुग्ण आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाची लागण झालेले ३ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांचा आकडा १५ वर पोहोचला आहे.

पुण्यातील हा रुग्ण अमेरिकेहून १ मार्च रोजी पुण्यात परतला होता. त्याची तपासणी ११ मार्च रोजी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह (coronavirus positive) आल्याने पुण्यातील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ९ वर गेली आहे. या रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. 

तर पिंपरी-चिंचवडमध्ये ५ संशयीत रुग्णांची (coronavirus infected patient) वैद्यकीय चाचणी केली असता, ५ पैकी ३ रुग्णांना कोरोनाची लागण झाल्यानं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे दोघा रुग्णांना घरी सोडण्यात आलं असून तिघांवर आयसोलेशन वाॅर्डमध्ये तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. 

सद्यस्थितीत पुण्यात कोरोनाचे १२ रुग्ण, मुंबईत २ रुग्ण आणि नागपूरमध्ये कोरोना बाधीत एका रुग्णावर उपचार सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रात कोरोना बाधीत रुग्णांची एकूण संख्या १५ वर गेली आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा