Advertisement

एप्रिलपासून मुंबई विद्यापीठाची परीक्षा टॅबवर

मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) परीक्षा आता टॅबवर (Tab) होणार आहेत.

एप्रिलपासून मुंबई विद्यापीठाची परीक्षा टॅबवर
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) परीक्षा आता टॅबवर (Tab) होणार आहेत. एप्रिलपासून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेऐवजी टॅब देण्यात येणार आहे. तसंच, या उत्तरपत्रिकेवर उत्तर लिहिण्यासाठी साध्या पेनऐवजी इलेक्ट्रिक पेन (Electric Pen) देण्यात येणार आहे. त्यामुळं आता विद्यार्थ्यांना (Students) इलेक्ट्रिक पेनने पेपर लिहिता येणार आहे. त्याचप्रमाणं हे कोणत्याही परदेशातील विद्यापीठाच्या परीक्षेचं वर्णन नसून ते मुंबई विद्यापीठाच्या आगामी परीक्षेचं आहे.

मुंबई विद्यापीठानं तंत्रज्ञानाचा (Technology) स्मार्ट वापर करून ऑनलाइन मूल्यांकन सुरू केलं. तसंच, आता विद्यापीठ थेट टॅबवरून परीक्षा घेणार आहे. याचा प्रयोगिक वापर येत्या एप्रिलमध्ये विद्यापीठाच्या परीक्षेत (University Exam) होणार आहे. यासाठी विद्यार्थी तसंच प्राध्यापकांना प्रशिक्षणही देण्यात आलं आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याकडं मुंबई विद्यापीठाचा कल असतो.

मुंबई विद्यापीठानं येत्या एप्रिलपासून परीक्षा ऑनलाइन घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळं कागदाची मोठ्या प्रमाणावर बचत होणार असून त्याचं मूल्यांकनही वेळेवर होणं शक्य होणार आहे. मुंबई विद्यापीठानं मागील वर्षी याबाबत घोषणा केली होती. मात्र, आता येत्या एप्रिलमध्ये याचा प्रत्यक्षात वापर सुरू होणार आहे.

विद्यार्थ्यांना स्मार्ट परीक्षेचा अनुभव घेता येणार आहे. विद्यापीठातील मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसीच्या (Mumbai School of Economics and Public Policy) एमएच्या चौथ्या सत्राची एप्रिलमधील परीक्षा या नव्या पद्धतीनं घेतली जाणार आहे. विद्यार्थ्यांना या परीक्षेचा सरावा व्हावा तसंच त्यांना उत्तर लिहिताना अधिकचा वेळ लागू नये यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्राध्यापकांनाही याचा वापर नेमका कसा करायचा, याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

तंत्रज्ञानाचा आधार घेत विद्यापीठाचं कामकाज कागदविरहित करण्यासाठी विद्यापीठ स्तरावर वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. त्याचप्रमाणं परीक्षाही कागदविरहित करण्यात येणार आहे. या विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळात लॉगइन केल्यावर त्यांच्या नावे संबंधित प्रश्नपत्रिका खुली होते. ही प्रश्नपत्रिका वाचून विद्यार्थी तेथेच उत्तरे लिहू शकणार आहेत.

उत्तरे लिहून पूर्ण झाल्यावर खाली असलेले सबमिट बटण दाबून विद्यार्थी उत्तरपत्रिका सबमिट करू शकतील. ही प्रक्रिया विद्यार्थीसुलभ असून याचा प्रयोग येत्या परीक्षेत अर्थशास्त्र विभागात करण्यात येणार असल्याती माहिती समोर येत आहे.हेही वाचा -

Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोना रुग्णाची संख्या १५ वर

राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने शिवसेनेचे चंद्रकांत खैरे भडकलेसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा