Advertisement

Coronavirus Updates: मुंबईत गर्दीच्या ठिकाणी मिळणार सॅनिटायझर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी राज्य सरकारकडून सॅनिटायझ आणि मास्क (sanitizer and mask) पुरवण्यात येणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (mumbai guardian minister aslam sheikh) यांनी शुक्रवारी दिली.

Coronavirus Updates: मुंबईत गर्दीच्या ठिकाणी मिळणार सॅनिटायझर
SHARES

मुंबईत कोरोना व्हायरसचा (coronavirus) फैलाव होऊ नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील गर्दीच्या ठिकाणी राज्य सरकारकडून सॅनिटायझ आणि मास्क (sanitizer and mask) पुरवण्यात येणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (mumbai guardian minister aslam sheikh) यांनी शुक्रवारी दिली.

मुंबईतही कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने राज्य सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची (coronavirus) संख्या वाढून १६ वर गेली आहे. त्यात सर्वाधिक १२ रुग्ण पुण्यातील असून २ रुग्ण मुंबई आणि १ रुग्ण नागपूरमधील आहे. 

हेही वाचा- Coronavirus Updates: कोरोनाच्या धसक्याने शिर्डीतली गर्दीही घटली!

त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने मुंबईतील माॅल्स, चर्चगेट रेल्वे स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह इतर रेल्वे स्थानकांवरही सॅनिटायझर आणि मास्क (sanitizer and mask) पुरविण्याचं ठरवलं आहे, असं अस्लम शेख यांनी सांगितलं. मास्कपेक्षा लोकांना स्वच्छतेसाठी सॅनिटायझरची जास्त गरज असल्याने सुरुवातीला जास्तीत जास्त लोकांना सॅनिटायझरचे वाटप करण्यात येईल. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मास्क पुरवण्याबाबत अद्याप शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्याबाबत लवकरच माहिती देण्यात येईल, असंही शेख (mumbai guardian minister aslam sheikh) यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, शालेय पालक संघटनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (education minister varsha gaikwad) यांना पत्र लिहून शाळांना तात्काळ सुट्ट्या जाहीर करण्याची मागणी केली आहे. रुस्तमजी इंटरनॅशनल, धीरूभाई अंबानी, ठाण्यातील वसंत विहार, जुहू येथील उत्पल संघवी, फोर्ट परिसरातील कॅथड्रल अशा शाळांनाही सुट्टी दिल्याची माहिती काही पालकांनी दिली आहे. तर ठाण्यातील आर्किड शाळेने परिपत्रक काढून पालकांना गरज नसल्यास पाल्याला शाळेत पाठवू नये, अशी सूचना केली आहे. 

हेही वाचा- हुश्श! मुलुंडमध्ये कोरोना रुग्ण नाही, 'ती' फक्त अफवाच

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा