अजय देवगण पोलिसांना पळवणार!

राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असलेले पोलिस येत्या रविवारी म्हणजेत ९फेब्रुवारी रोजी मुंबईच्या रस्त्यावर पळताना दिसणार आहे. निमित्त आहे ते पोलिसांतर्फे आयोजित केलेल्या महाराष्ट्र पोलिस इंटरनॅशनल मॅरेथाॅन २०२० चे या स्पर्धेत राज्यभरातून १५ हजार स्पर्धक सहभागी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आयोजन करण्याचे ठरवण्यात आले होते. या मॅरेथाॅनला अभिनेता अजय देवगण हा उपस्थित राहणार असल्याची माहिती कृष्ण प्रकाश यांनी दिली. 

हेही वाचाः- ​कोरोनाचे आणखी ४ संशयित रुग्ण​​​

 यापूर्वी अनेक खासगी कंपन्यांच्या नावाखाली मुंबईत मोठ मोठ्या मॅरेथाॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र यंदा देशात प्रथमच पोलिसांतर्फे महाराष्ट्रात पोलिस इंटरनॅशनल मॅरेथाँन स्पर्धेचे आयोजन केले जात असल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांनी सांगितले. या स्पर्धेत सर्व सामान्य नागरिकांसमावेत पोलिस अधिकारी आणि इंटरनॅशनल खेळाडू ही सहभागी होणार आहेत.ही स्पर्धा ४ भागात होणार असून ४२ किलोमीटर पूल मॅरेथाॅन, २१ किलोमीटरची हाफ मॅरेथाॅन आणि १० व ५ किलोमीटरची सहभागी मॅरेथाॅन होणार आहे. या स्पर्धेत एकूण ७३.४६ लाखा बक्षीस देण्यात येणार आहेत. पूर्ण मॅरेथाॅन जिंकणाऱ्या महिला-पुरूष विभागास ३ लाखांचे बक्षीस आहे. तर हाफ मॅरेथाॅन जिंकणाऱ्या पुरूष-महिला विभागास २ लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. 

हेही वाचाः- अखेर सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त मिळाला

या मॅरेथाॅनला खास उपस्थिती असणार आहे ती, अभिनेता अजय देवगणची या मॅरेथाॅनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. महाराष्ट्र पोलिसांनी इंडिया केयर्स फाऊंडेशन और गोल्ड जिमच्या मदतीने ‘ट्रेड फाॅर चेंज’च्या नावाने एका कार्यक्रम हाथी घेतला असून या कार्यक्रमाद्वारे ५ समाससेवा संस्थांसाठी पैसे गोळा केले जाणार असल्याची माहिती कृष्णप्रकाश यांनी दिली. 

पुढील बातमी
इतर बातम्या