Advertisement

कोरोनाचे आणखी ४ संशयित रुग्ण

जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूची (corona virus) लागण झालेल्या २१ संशयित रुग्णांना घरी पाठविल्यानंतर बुधवारी आणखी ४ संशयित रुग्ण राज्यात आढळून आले आहेत.

कोरोनाचे आणखी ४ संशयित रुग्ण
SHARES

जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूची (corona virus) लागण झालेल्या २१ संशयित रुग्णांना घरी पाठविल्यानंतर बुधवारी आणखी ४ संशयित रुग्ण राज्यात आढळून आले आहेत. या रुग्णांमध्ये मुंबईतील एक आणि नागपूरमधील ३ रुग्णांचा समावेश आहे. या चारही जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. 

हेही वाचा- कोरोनावर उपचाराचे व्हायरल मेसेज खोटे

मुंबईतील एका रुग्णामध्ये कोरोना विषाणूची (corona virus ) लागण झाल्याची लक्षणे दिसून आल्यानंतर त्याला तातडीने कस्तुरबा रुग्णालयात (kasturba hospital) कोरोनावरील उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या विशेष वाॅर्डात हलवण्यात आलं. सद्यस्थितीत या रुग्णावर तज्ज्ञ डाॅक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत. तर, कोरोना विषाणूची लागण झाल्याची लक्षणे दिसणाऱ्या तीन जणांना नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. या तीन रुग्णांपैकी एकाच्या तपासण्या निगेटीव्ह आढळून आल्या आहेत. उरलेल्या रुग्णांचे वैयकीय अहवाल हाती आल्यावर त्यासंबंधीची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली. 

दरम्यान मुंबई, पुणे, ठाणे यासह नांदेड, बुलढाणा, नागपूर, वर्धा, सांगली, अमरावती, पालघर, सातारा, जळगाव, नाशिक आणि अहमदनगरमध्ये बाधित भागातून प्रवासी आल्याचं आरोग्य मंत्रालयाला आढळलं असून या रुग्णांचा पाठपुरावा केला जात आहे.

दरम्यान, व्हाॅट्सअॅप (Whatsapp) वर मागील ४ ते ५ दिवसात कोरोना व्हायरस (corona virus ) वर उपचार सापडल्याचे मेसेज (msg) व्हायरल (Viral) होत आहेत. लसणाच्या पाकळ्या, कढीपत्त्याची पाने, गोमूत्र यामुळे कोरोना आजार बरा होईल, असा संदेश डॉक्टरांच्या नावासह व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र, हा संदेश खोटा आहे. करोना आजारावर अद्याप कोणतेही रामबाण औषध नाही.  या संदेशावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं आरोग्य विभागानं (Department of Health) स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा- कोरोना व्हायरस: तिघा संशयितांना घरी सोडलं

कोरोना व्हायरस (corona Virus ) बाबत व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये तथ्य नाही. यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कोणतेही पदार्थ खाण्यावरही निर्बंध नाहीत. मात्र अन्न ताजे, स्वच्छ, पूर्ण शिजवलेले खावे असे संसर्गजन्य साथरोग नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं आहे. तसंच या मेसेजना कोणताही शास्रीय आधार नाही. लक्षणांवर उपचार केले जात आहेत, असं आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितलं. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा