Advertisement

कोरोना व्हायरस: तिघा संशयितांना घरी सोडलं

जगभर धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूची (corona virus) लागण झाल्याच्या संशयावरून मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या ६ पैकी ३ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे.

कोरोना व्हायरस: तिघा संशयितांना घरी सोडलं
SHARES

जगभर धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूची (corona virus) लागण झाल्याच्या संशयावरून मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या ८ पैकी ३ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. वैद्यकीय चाचणीत या तिघांचे नमुने निगेटिव्ह (nigetive) आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने (bmc health department) दिली. पुढील किमान तीन आठवडे (२८ दिवस पूर्ण होईपर्यंत) त्यांची दूरध्वनीद्वारे दररोज विचारपूस करण्यात येणार आहे. 

हेही वाचा- सेक्स पाॅवर वाढवण्याचा हव्यास नडला, लिंगात अडकली लोखंडी रिंग

सध्या राज्यात ९ जणांचे अहवाल निगेटिव्ह (nigetive report) आले असून त्यांनाही देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यापैकी ३ मुंबईत, पुण्यातील नायडू रुग्णालयात ५, तर नांदेड इथं एकाला ठेवण्यात आलं आहे. आतापर्यंत मुंबई विमानतळावर (mumbai airport) ४ हजार ८४६ प्रवाशांची थर्मल स्कॅनद्वारे वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (health minister rajesh tope) यांनी दिली.

कोरोना विषाणूवर (corona virus symptoms) अद्याप कुठलाही प्रकारचा उपचार उपलब्ध नाही. त्यामुळे या विषाणूपासून बचावाचा (prevention) एकमात्र उपाय आहे, तो म्हणजे काळजी घेणे. नाक गळणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, ताप ही करोना विषाणूची लक्षणं आहे. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या व्यक्तींना या विषाणूची लागण पटकन होते. त्यामुळे कुठल्याही आजारी व्यक्ती, सर्दी किंवा न्यूमोनिया झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येण्याचं टाळा. गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क घाला. नाक आणि तोंडाला सतत स्पर्श करण्याचं टाळा आणि नेहमी हात स्वच्छ धुवा. 

हेही वाचा-  मुंबईत कोरोना व्हायरसचा धोका? 'अशी' घ्या खबरदारी

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा