Advertisement

सेक्स पाॅवर वाढवण्याचा हव्यास नडला, लिंगात अडकली लोखंडी रिंग

डाॅक्टरांनी गॅस कटरच्या माध्यमातून ती रिंग कापून तरुणाचे प्राण वाचवले.

सेक्स पाॅवर वाढवण्याचा हव्यास नडला, लिंगात अडकली लोखंडी रिंग
SHARES

लैंगिक क्षमता (Sexual stimulation) वाढवण्यासाठी केलेला कृत्रिम प्रयोग मुंबई (mumbai) मधील एका तरुणाला चांगलाच महागात पडला. हस्तमैथुनासाठी त्याने ३ एमएमची लोखंडी रिंग वापरली. मात्र रिंग अडकून राहिल्याने त्याने जे.जे. रुग्णालयात (JJ hospital) धाव घेतली. अखेर डाॅक्टरांनी गॅस कटरने ती रिंग कापून तरुणाचे प्राण वाचवले. या आगळ्यावेगळ्या सर्जरीची चर्चा सध्या जे.जे. रुग्णालयात रंगू लागली आहे.

हेही वाचाः-न्यूझीलंडच्या खेळाडूंची खिलाडूवृत्ती, प्रतिस्पर्धी फलंदाजाला खाद्यावर उचलले

दक्षिण मुंबईत राहणाऱ्या एका तरुणाने लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी सोशल मिडियावर लोखंडी रिंगच्या मदतीने हस्तमैथुन करतानाचा व्हिडिओ पाहिला होता. हाच प्रयोग त्याने स्वतःसोबत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा प्रयोग चांगलाच अंगलट आला. हस्तमैथून करताना त्याचे लिंग त्या लोखंडी रिंगमध्ये अडकून राहिले. मात्र, ही बाब त्याने त्याच्या घरच्यांपासून लपवून ठेवत, वेगवेगळे प्रयोग करून रिंगमध्ये अडकलेले लिंग (private part) बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तो त्यात अयशस्वी ठरला. बदनामीच्या भितीने तो तरुण दोन दिवस त्याच अवस्थेत फिरत होता. मंगळवारी वेदनांनी असह्य झालेल्या त्या तरुणाने जे.जे. रुग्णालय गाठत डाॅक्टरांची मदत घेतली. मात्र अनेक प्रयत्न करूनही डाॅक्टरांनीही ती रिंग निघाली नाही.

हेही वाचाः- भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे भाजपचा हात, गृहमंत्र्यांचा गंभीर आरोप

अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांची मदत घेण्याचे डाॅक्टरांनी ठरवलं. बांधकाम विभागातील एका वेल्डरच्या मदतीने अडकलेली रिंग अत्यंत सावधगिरीने गॅस कटरद्वारे काढण्यात आली. रिंग निघाली तरी त्या तरुणाची प्रकृती खालावली होती. त्यासाठी डाॅक्टरांना त्या तरुणावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करावी लागली. सध्या या शस्त्रक्रियेची चर्चा रुग्णालयात रंगत आहे.


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement