Advertisement

कोरोनावर उपचाराचे व्हायरल मेसेज खोटे

व्हाॅट्सअॅप (Whatsapp) वर मागील ४ ते ५ दिवसात कोरोना व्हायरस (corona Virus ) वर उपचार सापडल्याचे मेसेज (msg) व्हायरल (Viral) होत आहेत.

कोरोनावर उपचाराचे व्हायरल मेसेज खोटे
SHARES

व्हाॅट्सअॅप (Whatsapp) वर मागील ४ ते ५ दिवसात कोरोना व्हायरस (corona Virus ) वर उपचार सापडल्याचे मेसेज (msg) व्हायरल (Viral) होत आहेत. लसणाच्या पाकळ्या, कढीपत्त्याची पाने, गोमूत्र यामुळे कोरोना आजार बरा होईल, असा संदेश डॉक्टरांच्या नावासह व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मात्र, हा संदेश खोटा आहे. करोना आजारावर अद्याप कोणतेही रामबाण औषध नाही.  या संदेशावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असं आरोग्य विभागानं (Department of Health) स्पष्ट केलं आहे. 

कोरोना व्हायरस (corona Virus ) बाबत व्हायरल झालेल्या मेसेजमध्ये तथ्य नाही. यावर नागरिकांनी विश्वास ठेवू नये. कोणतेही पदार्थ खाण्यावरही निर्बंध नाहीत. मात्र अन्न ताजे, स्वच्छ, पूर्ण शिजवलेले खावे असे संसर्गजन्य साथरोग नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं आहे. तसंच या मेसेजना कोणताही शास्रीय आधार नाही. लक्षणांवर उपचार केले जात आहेत, असं आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी सांगितलं. 

दरम्यान, मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासह राज्यात आतापर्यंत ११ हजार ९३ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातील १०७ जण चीनमधील कोरोनाचा सर्वाधिक फैलाव असलेल्या भागातून आलेले आहेत. कोरोना व्हायरसशी (corona Virus) मुकाबला करण्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा सज्ज असून आवश्यक पावले उचलण्यात येत आहेत. त्यामुळे कोरोनाबाबत कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. चीन (china) तसेच चीनच्या शेजारी देशांमधून जे कुणी परतत आहेत त्यांची तपासणी करून सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी असा त्रास असलेल्या प्रवाशांना मुंबई आणि पुण्यातील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात येत आहे. विविध रुग्णालयांत स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आकोरोनाबाबत कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. ले आहेत. मुंबई, पुण्यासह नांदेडमधील निवडक रुग्णालयांमध्येही वैद्यकीय पथके नेमण्यात आली आहेत.

  • व्हाॅट्सअॅप (Whatsapp) वर मागील ४ ते ५ दिवसात कोरोना व्हायरस (corona Virus ) वर उपचार सापडल्याचे मेसेज (msg) व्हायरल (Viral) होत आहेत. 
  • लसणाच्या पाकळ्या, कढीपत्त्याची पाने, गोमूत्र यामुळे कोरोना आजार बरा होईल, असा संदेश डॉक्टरांच्या नावासह व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
  • मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळासह राज्यात आतापर्यंत ११ हजार ९३ जणांची तपासणी करण्यात आली आहे. 
  • कोरोनाबाबत कुणीही घाबरून जाण्याचे कारण नाही, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. 

हेही वाचा -

आर्थिक उत्पनाच्या कमतरतेमुळं महापालिकेची नोकरभरती बंद

महापालिकेकडून बेस्टला १५०० कोटींची मदत

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम बंद पाडण्याचा प्रयत्न, आंदोलकांची धरपकड




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा