Advertisement

अखेर सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त मिळाला

सायन उड्डाणपुलाच्या (Sion Bridge) दुरूस्तीच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे.

अखेर सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त मिळाला
SHARES

मुंबईतील सायन उड्डाणपुलाच्या (Sion Bridge) दुरूस्तीच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. येत्या १४ फेब्रुवारीपासून सायन उड्डाणपुलाचं बेअरिंग (Bearing) बदलण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे. त्यााशिवाय, ६ एप्रिलपर्यंतच्या प्रत्येक आठवड्यात ४ दिवस आणि ६ एप्रिलनंतर सलग २० दिवस पुलावरील वाहतूक पूर्ण बंद ठेवण्यात येणार आहे. सायन उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचं (Sion Brdge repaire) काम वर्षभरापासून रखडलं असून, २ वर्षांपूर्वी आयआयटी मुंबईनं (IIT Bombay) सायन उड्डाणपुलाची स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) केल्यानंतर १७० बेअरिंग बदलण्यास सांगितलं होतं.

सायन उड्डाणपूल हा पूर्व उपनगरे, नवी मुंबई आणि ठाणे येथून मुंबईत प्रवेश करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या पूल आहे. तसंच, या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. त्यामुळं उड्डाणपुलाच्या दुरूस्तीच्यावेळी या परिसरात वाहतुककोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डिसेंबर २०१८ पासून पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली. त्यानंतर मागील वर्षभरात ३ ते ४ वेळा दुरुस्तीचं काम सुरू करण्याचं ठरलं. प्रत्यक्षात मात्र कामाला सुरुवातच झाली नव्हती. अखेरीस १४ फेब्रुवारीपासून बेअिरग बदलण्याच्या कामास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (Maharashtra State Roads Development Corporation) सुरुवात करण्यात येणार आहे.

बेअरिंग बदलण्याचं काम सलग न करता आठवड्यातील ४ दिवसच करण्याचा निर्णय वाहतूक विभाग आणि महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. १४ फेब्रुवारीपासून दर आठवड्यात गुरुवारी रात्री १० ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत दुरुस्तीचं काम केलं जाणार असून, उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्याचप्रमाणं, एप्रिलअखेर उड्डाणपुलाचं काम पूर्ण होणार असल्याची माहिती मिळते.

काम वेगानं पूर्ण करण्यासाठी ३०० मेट्रिक टन क्षमतेचं जॅक अधिक संख्येनं मागविण्यात आले आहेत. बेअरिंग बदलण्याच्या कामादरम्यान वाहतूक पोलिसांना मदतीसाठी ३० ट्रॅफिक वॉर्डनदेखील देण्यात आल्याची माहिती मिळते.

वाहतूक बंदचं वेळापत्रक

  • ४ फेब्रुवारी रात्री १०.०० ते १७ फेब्रुवारी सकाळी ६.००
  • २० फेब्रुवारी रात्री १०.०० ते २४ फेब्रुवारी सकाळी ६.००
  • २७ फेब्रुवारी रात्री १०.०० ते २ मार्च सकाळी ६.००
  • ५ मार्च रात्री १०.०० ते ९ मार्च सकाळी ६.००
  • १२ मार्च रात्री १०.०० ते १६ मार्च सकाळी ६.००
  • १९ मार्च रात्री १०.०० ते २३ मार्च सकाळी ६.००
  • २६ मार्च रात्री १०.०० ते ३० मार्च सकाळी ६.००
  • २ एप्रिल रात्री १०.०० ते ६ एप्रिल सकाळी ६.००
  • ६ एप्रिलपासून : सलग २० दिवस वाहतूक बंदहेही वाचा -

मुंबईतील धरण, तलाव होणार पर्यटनस्थळ

कोरोनाचे आणखी ४ संशयित रुग्णसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा