सराईत दरोडेखोरांच्या माहिम पोलिसांनी आवळल्या मुसक्या

माहिमच्या मुकदुम शहा दर्गाच्या पाठीमागे दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा माहिम पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच सराईत आरोपींना अटक केली असून त्यांच्याजवळून पोलिसांनी एक लोखंडी मूठ, मिरची पावडर, दोरी, गुप्ती, लोखंडी राँड हस्तगत केले आहेत.माहिम परिसरातील एका दुकानावर दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात हे आरोपी होते. मात्र दरोडा टाकण्याच्या आधीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या..

हेही वाचाः- ‘ते’ ट्विट चुकीने, ठाकरे सरकारमधील मंत्र्याची कबुली

सुरज मोहन सिंह उर्फ चिन्या (३४), दिपक दिलीप भालेराव उर्फ दिपु (१९), मोहम्मद शहाबुद्दीन मुस्तकीन खान (३६), शरफुद्दीन सय्यद (३६), करीन अब्दुल गफुर शहा (३०)अशी या आरोपींची नावे आहेत. माहिमच्या मुकदुम शहा दर्गाच्या पाठीमागील दुकानात दरोडा टाकण्यासाठी हे आरोपी आले होते. माहिमचे पोलीस रात्री गस्तीवर असताना त्यांनाही आरोपी संशयास्पद फिरताना आढळून आले. या आरोपींची अंग झडती घेतली असता. या आरोपींजवळून एक लोखंडी मूठ, मिरची पावडर, दोरी, गुप्ती, लोखंडी राँड हस्तगत केले आहेत. याप्रकरणी माहिम पोलिसांनी पाचही आरोपींवर ३९९,४०२ भादवी कलमांसह, ३७(१)(अ)१३५ सह कलम ४,२५ भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे. यातील आरोपी सुरज मोहन सिंह याला पूर्वीही वांद्रे पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात कारवाई केली आहे.

हेही वाचाः- हेमंत नागराळे महाराष्ट्राचे तात्पुरते नवे पोलिस महासंचालक

दरम्यान शासनाने लॉकडाऊन शिथिल करताच शहरामध्ये चोर, दरोडेखोरांच्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. मुंबईत दरोडे टाकण्यासाठी आलेल्या अशाच तीन टोळ्यांच्या मुसक्या मागील आठवड्यात मुंबई पोलिसांनी आवळल्या आहेत. विशेष म्हणजे यातील दोन टोळ्यातील आरोपींकडे पोलिसांनी बंदुक आणि जिवंत काडतुसेही आढळून आली आहेत. तीनही टोळीतील आरोपींवर या पूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आली आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या