हेमंत नागराळे महाराष्ट्राचे तात्पुरते नवे पोलिस महासंचालक


हेमंत नागराळे महाराष्ट्राचे तात्पुरते नवे पोलिस महासंचालक
SHARES
राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जैयस्वाल यांची सीआयएसएफच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे नवे पोलीस महासंचालक कोण होणार  याची उत्सुक्ता असताना. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली आहे. 

हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.  हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता. त्यानंतर 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे सध्या पोलिस महासंचालक (विधी आणि तंत्रज्ञान) म्हणून कार्यरत आहेत. हेमंत नगराळे नवी मुंबईचे पोलीस आयुक्त असताना देशभर गाजलेल्या वाशीतील बँक ऑफ बडोदा दरोड्याची उकल अवघ्या दोन दिवसात केल्याने त्यांचे कौतुक झाले होते. 17 वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा, पॉप गायक जस्टीन बिबरच्या कार्यक्रमात चांगली कायदा-व्यवस्था ठेवल्याने त्यांना शाबासकीची थाप मिळाली होती. त्यांच्या काळात झालेली पोलीस क्रीडा स्पर्धाही राज्यात गाजली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फी, बदली करण्यातही ते अग्रेसर होते.

चुरस अद्याप संपलेली नाही

सुबोध जैयस्वाल यांन कार्य मुक्त करण्यात आल्याने पोलिस महासंचलकाचा तात्पूर्ता कार्यभार हा हेमंत नगराळे यांच्याकडे सोपवला आहे. त्यामुळे पोलिस महासंचालक पदाची रस्सीखेच ही अद्याप सुरूच आहे . त्यामुळे नवे पोलिस महसंचालक कोण होणार, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार संजय पांडे हे अग्रस्थानी असले, तरी बिपीन बिहारी आणि हेमंत नगराळे यांची नावेही चर्चेत आहेत. इतकेच नाही तर मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक रजनीश शेठ यापैकी एक महासंचालक होऊ शकतात, अशीही पोलिस वर्तुळात चर्चा आहे.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा