Advertisement

‘ते’ ट्विट चुकीने, ठाकरे सरकारमधील मंत्र्याची कबुली

सीएमओचं ट्विटर हॅण्डल करणाऱ्या ज्या व्यक्तीकडून ही चूक झाली आहे, त्याला समज देण्यात येईल.

‘ते’ ट्विट चुकीने, ठाकरे सरकारमधील मंत्र्याची कबुली
SHARES

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून औरंगाबद शहराचा उल्लेख संभाजीनगर असा झाल्यापासून महाविकास आघाडी सरकारमधील घटकपक्षांमध्ये वादाची नवी ठिणगी पडली आहे. हे ट्विट ताबडतोब डिलिट करण्यात आलेलं असलं, तरी यावरून तिन्ही पक्षांमधील नेत्यांचे दावे-प्रतिदावे सुरूच आहेत.

या ट्विटबाबत मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेस नेते अस्लम शेख (aslam sheikh) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अस्लम शेख म्हणाले की, कधी कधी टायपिंग करताना चूक होते. तर कधी एखाद्या व्यक्तीने लिहून दिलेला मजकूर टाईप करतानाही चूक होऊ शकते. तसाच काहीसा प्रकार याबाबतही घडल असावा. मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा मी मंत्री म्हणून ट्विटरचं अकाऊण्ट हॅण्डल करत नाही. ती जबाबदारी जनसंपर्काचं काम करणाऱ्या व्यक्तीकडे सोपवण्यात आलेली असते. सीएमओचं ट्विटर हॅण्डल करणाऱ्या ज्या व्यक्तीकडून ही चूक झाली आहे, त्याला समज देण्यात येईल, असं शेख यांनी सांगितलं.

हेही वाचा- ‘संभाजीनगर’च्या परस्पर नामांतरावरून काँग्रेसमध्ये संताप

मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या खात्याबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून सायंकाळी ६ वाजता एक ट्विट करण्यात आलं. या ट्विटमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करण्यात आला होता. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये काँग्रेसचेच मंत्री अमित देशमुख यांचा फोटो वापरण्यात आला होता. या ट्विटची चर्चा सुरू होताच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांनी तातडीने ३ ट्विट करत आपला संताप व्यक्त केला. 

महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (@MahaDGIPR) शहरांचं परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचं भान बाळगावं. शहरांचं नामांतरण करणं हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही, असं बाळासाहेबत थोरात म्हणाले होते.

तर, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे, त्यामुळे विकासाला आम्ही महत्त्व दिलं आहे. तीच भूमिका घेऊन सरकार पुढे चाललं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी स्पष्ट केलं.

cmo mistakenly typed sambhaji nagar word for aurangabad says congress minister aslam sheikh

हेही वाचा- तर उद्या ‘या’ शहरांच्या नामांतराचीही मागणी होईल- अजित पवार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा