बॅण्ड स्टॅण्डच्या खडकात तरुणीवर बलात्कार

वांद्र्यातील बॅण्ड स्टॅण्ड येथे एका तरुणीवर बलात्कार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार झाल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात ३७६ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून हकीम (२१) नावाच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

हकीम आणि सांताक्रूझमध्ये राहणारी १८ वर्षीय पीडित तरुणी एकमेकांच्या परिचयाचे होते. ११ ऑक्टोबरच्या रात्री हकिमने पीडित तरूणीला बीकेसीच्या सिटी पार्क जवळ भेटायला बोलावलं. त्यानंतर हकीम मुलीला घेऊन बॅण्ड स्टॅण्डला गेला. बॅण्ड स्टॅण्डच्या खडकात घेऊन जात त्याने लग्नाचं आमिष दाखवत इच्छेविरुद्ध बलात्कार केल्याचं पीडित तरूणीने आपल्या जबाबात म्हटलं आहे.

गुन्हा वांद्रे पोलिसांकडे वर्ग

तरूणीने घडलेला प्रकार आपल्या काकीला सांगितल्यावर मुलीच्या कुटुंबीयांनी हकीमकडे याबाबत विचारणा केली. मात्र त्यांने उडवाउडवीची उत्तरे दिल्यावर पीडित तरूणीने वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ ३७६ कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद करत हा गुन्हा पुढील तपासासाठी वांद्रे पोलीस ठाण्याकडे वर्ग केला आहे. या प्रकरणी हकीमला अटक करण्यात आली असून सध्या तो वांद्रे पोलिसांच्या ताब्यात आहे.


हेही वाचा-

मौजमजेसाठी ही लहान मुलं करायची दुचाक्यांची चोरी!

सायनमध्ये २ कोटींचं हेराॅईन जप्त


पुढील बातमी
इतर बातम्या