मौजमजेसाठी ही लहान मुलं करायची दुचाक्यांची चोरी!


मौजमजेसाठी ही लहान मुलं करायची दुचाक्यांची चोरी!
SHARES

मौजमजेसाठी दुचाकी पळवणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या दुकडीला खार पोलिसांनी पकडले आहे. विशेष म्हणजे हे दोघे फक्त मौज मज्जेसाठी (जॉय राईड) दुचाकी पळवत असत. त्यानंतर पेट्रोल संपेपर्यंत ते दुचाकी चालवायचा मनसोक्त आनंद घेत आणि पेट्रोल संपल्यावर दुचाकी सोडून तिथून पसार होत असत. या दोघांवर अशा प्रकारचे १० गुन्हे नोंद असल्याचं समोर आलं आहे.


का व्हायची चोरी?

मुंबईच्या पश्चिम उपनगरातून विशेष करून खार वांद्रे परिसरातून दुचाकींच्या चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. चोरी केलेल्या दुचाकी या काही दिवसांतच कधी रस्त्याच्या कडेला बेवारस अवस्थेत, तर कधी आडबाजूला पोलिसांना सापडत होत्या. अशा प्रकारे दुचाकी बेवारस सोडण्यात आल्याने पोलिसांना हे समजलं होतं कि या दुचाकी चोरीच्या उद्देशाने नव्हे, तर फक्त जॉय राईड (मौजमजे)साठी चोरण्यात आल्या होत्या.


कसा लागला तपास?

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना या दोघा अल्पवयीन मुलांची माहिती मिळाली. १५ आणि १६ वर्षीय हे दोघे मित्र या दुचाकी चोरीच्या मागे असल्याचे पोलिसांना समजले. दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असता आपणच या सगळ्या चोरी केल्याचं त्यांनी मान्य केलं. या दोघांनी खार पोलीस ठाण्यातील एक अॅक्टिव्हा, तसेच वांद्रे आणि इतरत्र अशा एकूण १० दुचाकींची चोरी केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. हे दोघेही अल्पवयीन असल्याने दोघांनाही खार पोलिसांनी बाल सुधार समितीकडे सोपवलं आहे.


कशी पळवायचे दुचाकी?

बाईक चालवण्यात पटाईत असलेले हे दोघे कधी मास्टर की (बनावट चावी) च्या मदतीने, तर कधी वायरिंगमध्ये फेरफार करून दुचाकी सुरु करत असत. त्यानंतर पेट्रोल संपेपर्यंत हे दोघे बाईकची सवारी करत आणि पेट्रोल संपल्यावर बाईक रस्त्यावरच टाकून पसार होत असत.



हेही वाचा

सायनमध्ये २ कोटींचं हेराॅईन जप्त

'लोन वूल्फ'वर मुंबई पोलिसांची करडी नजर!


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा