सापाच्या नादात झालं अकाऊंट ‘साफ’

गुगलवरील प्रत्येक माहिती खरीच असते, यावर विश्वास ठेवत असाल, तर तुम्हाला महागात पडू शकतं. असा एक प्रकार भोईवाडा येथील व्यापाऱ्याला नुकताच महागात पडला आहे. घरात साप आढळून आल्याने या व्यापाऱ्याने गुगलवर सर्प मित्राचा नंबर शोधला. परंतु हा सर्पमित्र भामटा निघाल्याने व्यापाऱ्याला ३६ हजारांना चूना लागला. या प्रकरणी भोईवाडा पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचाः- सैन्य आणि पोलिसांच्या गाड्यांना फास्टॅग बंधनकारक

डोंगरी परिसरात राहणाऱ्या या व्यापाऱ्याचं परळ भोईवाडा इथं कपड्याचं दुकान आहे. रविवारी सकाळी व्यापारी नेहमीप्रमाणे त्याच्या दुकानावर असताना दुपारी ४ वा. त्याला त्याच्या भावाच्या पत्नीचा फोन आला. ‘घरात विषारी साप आला असून तुम्ही तातडीने सर्प मित्राला बोलवा असं तिने सांगितलं’. हे ऐकल्यानंतर व्यापाऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली. मुंबईत अशा घटना क्वचितच घडतात. त्यामुळे सर्प मित्राचे फोन कुणी मोबाइलवर ठेवत नाही. त्यामुळे अशा प्रसंगी सर्रास लोक गुगलवर नंबर मिळवण्यासाठी सर्च करतात. त्यानुसार व्यापाऱ्यानेही तेच केलं. ‘गुगलवर अॅनिमल हाॅस्पीटल परेल’ असं सर्च केल्यानंतर त्याला १८००२०८७१०३ हा नंबर मिळाला. व्यापाऱ्याने त्यावर फोन केला असता. फोनवरील व्यक्तीने ‘मै तुम्हारा फोन नंबर मेरे दोस्त को देता हू, वो आपको तुरंत काॅल करेगा और सभी जानकारी देगा,  असं सांगून फोन कट केला. काही क्षणातच व्यापाऱ्याला ९३३०९२९०२३ या क्रमांकावरून फोन आला.

हेही वाचाः- गोयल कधीतरी मुंबईत येतील, मनसेचा इशारा

‘मैं अॅनिमल हाॅस्पिटल केअर सेंटर परेल से बोल रहा हू, सर मै एक आपको लिंक भेज देता हू,  उसपे आप १० रुपये भेज दो, ये हाॅस्पिटल का प्रोसिजर है!’ असे सांगितल्यानंतर व्यापाऱ्याच्या नंबरवर त्या क्रमांकावरून एक लिंक पाठवण्यात आली. व्यापाऱ्याने लिंक ओपन केली व त्यात त्याचं नाव मोबाइल नंबर टाकला. तसंच आॅनलाईन पेमेंट सिस्टम असल्यामुळे बँकेचा यु.पी आय नं टाकला आणि अवघ्या एका मिनिटात व्यापाऱ्याच्या खात्यातून पहिल्यांदा ५ हजार, दुसऱ्यांदा २९ हजार ९९९, तिसऱ्यांदा ७०० असे कट झाल्याचा मेसेज आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापाऱ्याने त्वरित बँकेत संपर्क साधून खाते ब्लाॅक केले. व्यापाऱ्याने पुन्हा त्या नंबरवर वारंवार फोन केला असता. समोरील व्यक्ती फोन कट करत होता.

या प्रकरणी व्यापाऱ्याने भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या सर्व गोंधळात पुढे त्या सापाचे काय झालं हे मात्र कळू शकलं नाही. त्यामुळे गुगलवर प्रत्येक माहिती ही खरी असते असं नाही. त्यामुळे अशा भामट्यांपासून सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या