तुर्भे स्थानकावर महिलेसमोर हस्तमैथुन

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईतील तरुणींना धक्कादायक प्रसंगांना सामोरं जाव लागत असल्याच्या घटना समोर येत आहेत. सीएसएमटी स्थानकावर एका प्रवाशानं तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरुणीला पाहत हस्तमैथुन केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा तुर्भे स्थानकावर अशीच घटना घडली अाहे.  

महिलांच्या डब्यासमोर एका विकृत तरुणानं अापले सर्व कपडे काढून हस्तमैथुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानकात हा प्रकार घडल्यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या प्रकरणी वाशी पोलिसांनी मोहम्मद शमशेर मोहम्मद सिद्धिकी मनियार (२२) याला अटक केली आहे.

अारोपीला चोप

नवी मुंबईच्या वाशी परिसरात राहणारी तक्रादार महिला २४ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजताच्या वाशी ते ठाणे या लोकलने कामावर निघाली होती. त्यावेळी तुर्भे स्थानकावर ती उतरली  असताना, मनियार हा स्थानकावरील महिला डब्याच्या समोरील बाकड्यावर कपडे काढूनच बसला होता. तक्रादार महिला डब्यातून खाली उतरल्यानंतर तिचे लक्ष गेल्यावर त्याने तिच्याकडे पाहून हस्तमैथुन करण्यास सुरूवात केली. यावेळी महिलेने स्थानकावरील महिलांना याबाबतची माहिती दिल्यानंतर महिलांनी मनियारला चोप देत पोलिसांशी संपर्क साधला. वाशी पोलिसांनी मनियारवर ३५४ (अ) (ड) भा.द.वि नुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे.

माथेफिरूला अटक

चेंबूरमध्ये एका महिलेला फोन करून तिला भेटायला येण्यासाठी धमकवणाऱ्या एका माथेफिरूला चेंबूर पोलिसांनी अटक केली आहे. राजेश वर्मा (२९) असं या आरोपीचे नाव असून तो अशोकनगर नवजीवन सोसायटीत पत्नीसोबत राहतो. मागील अनेक दिवसांपासून या महिलेवर वर्माची वाईट नजर होती. पीडितेचा नंबर तिच्या जवळच्या नातेवाईकाकडून मिळवून तिला फोन करून त्रास देत होता. ही बाब तिने नवऱ्याच्या कानावर घातल्यानंतर त्याने नोंदवलेल्या गुन्ह्यानंतर चेंबूर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.  


हेही वाचा - 

दुचाकी चोरणारे बंंटी-बबली अटकेत; ९ दुचाकी हस्तगत

भाडेकरू मुलीचं केलं अश्लील चित्रीकरण, गिरगावमधील घरमालकाला अटक


पुढील बातमी
इतर बातम्या