शिकाऊ डॅाक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न

  • मुंबई लाइव्ह टीम & भाग्यश्री भुवड
  • क्राइम

एमबीबीएस इंटर्नशीपचा विद्यार्थी त्रिरत्न वाठोरे (२९) हा आर.एम. भट्ट वसतिगृहाच्या इमारतीवरून पडल्याने त्याला त्वरीत जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेत वाठोरे याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती जे.जे. वैद्यकीय अधिक्षक डाॅ. संजय सुरासे यांनी दिली.

कधी घडली घटना?

गुरूवारी सकाळी ११.३० च्या सुमारास त्रिरत्न याला त्याच्या मित्रांनी जे. जे रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी तो पूर्णतः बेशुद्ध होता. त्याचं सिटी स्कॅन करण्यात आल्यावर त्याच्या मेंदूत रक्तस्त्राव झाल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर जे. जे. तील न्यूरोसर्जन्सनी त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया केली.

सध्या तो अतिदक्षता विभागात दाखल असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डाॅ. सुरासे यांनी दिली. प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचा-

क्षुल्लक कारणावरून भावानेच भावाची केली हत्या

मम्मीच्या अडचणीत वाढ, दुसऱ्यांदा गुन्हा दाखल


 

पुढील बातमी
इतर बातम्या