क्षुल्लक कारणावरून भावानेच भावाची केली हत्या


क्षुल्लक कारणावरून भावानेच भावाची केली हत्या
SHARES

भांडुपमध्ये क्षुल्लक कारणावरून लहान भावाने मोठ्या भावाची पाईपने मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. सुनिल रावजी पालेकर असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी भांडुप पोलिसांनी गणेश पालेकर (45) याला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.


धूळ उडाली म्हणून हत्या

भाडुंपच्या न्यू लकडावाला बिल्डिंग, स्टेशन रोड येथे सुनिल व गणेश हे सख्खे भाऊ एकत्र कुटुंबात राहतात. मात्र, काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू होते. त्यावरून घरातील वातावरण कायमच बिघडलेले होते. अशातच मंगळवारी रात्री सुनिल हे घरात झाडू मारत होते. त्या ठिकाणी गणेश यांचा मुलगा बसला होता. सुनिल झाडू मारत असताना, कचऱ्यातील धूळ गणेश यांच्या मुलावर उडाली. यावर सुनिल व गणेश यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, गणेश यांनी सुनिल यांना पी.व्ही.सी पाईपने मारहाण केली.


भावाविरोधात हत्येचा गुन्हा

या मारहाणीत सुनिल हे गंभीर जखमी झाले. वेळीच शेजाऱ्यांनी भांडण सोडवत सुनिल यांना त्यांची पत्नी वासंती यांनी जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत फार उशिर झाला होता. डॉक्टरांनी सुनिल यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी वासंती यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गणेश विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. न्यायालयाने गणेशला न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांनी दिली.



हेही वाचा

बहिणीशी बोलला म्हणून तरुणाची हत्या


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा