बहिणीशी बोलला म्हणून तरुणाची हत्या

ट्राॅम्बे परिसरात राहणाऱ्या बिंदूची त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत मैत्री होती. मुलीचा भाऊ रघू प्रजापती (२३) याला बिंदूचं तिच्याशी बोलणं आवडायचं नाही. त्यातून त्याने दोन वेळा बिंदूला त्याच्या बहिणीपासून दूर राहण्यास बजावलंही होतं. त्यानंतरही ११ एप्रिल रोजी बिंदूने त्याच्या बहिणीशी बोलण्याचा प्रयत्न केला.

बहिणीशी बोलला म्हणून तरुणाची हत्या
SHARES

बहिणीशी जवळीक साधत तिच्यासोबत बोलल्याच्या रागातून मुलीच्या भावाने २२ वर्षीय तरुणाची हत्या केल्याची घटना ट्राॅम्बे परिसरात घडली आहे. बिंदू प्रजापती असं मृत तरुणाचं नाव आहे. बिंदू प्रजापतीला ११ एप्रिल रोजी मारहाण झाली होती. परंतु उपचारादरम्यान, सोमवारी बिंदूचा मृत्यू झाला. त्यामुळे याप्रकरणी ट्रॉम्बे पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

ट्राॅम्बे परिसरात राहणाऱ्या बिंदूची त्याच्या शेजारी राहणाऱ्या मुलीसोबत मैत्री होती. मुलीचा भाऊ रघू प्रजापती (२३) याला बिंदूचं तिच्याशी बोलणं आवडायचं नाही. त्यातून त्याने दोन वेळा बिंदूला त्याच्या बहिणीपासून दूर राहण्यास बजावलंही होतं. त्यानंतरही ११ एप्रिल रोजी बिंदूने त्याच्या बहिणीशी बोलण्याचा प्रयत्न केला.

निर्जन स्थळी मारहाण

या रागातून रघूने त्याच्या मित्रांना बोलावलं आणि ट्राॅम्बे खाडी परिसरातील निर्जन स्थळी गाठून बिंदूवर काठ्यांनी हल्ला केला. या मारहाणीत बिंदू जागीच बेशुद्ध पडला. स्थानिकांनी बिंदूला बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर पाहिल्यानंतर पोलिसांना बोलवून उपचारासाठी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल केलं. बिंदूच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याच्यावर सायनच्या आपत्कालीन विभागात उपचार सुरू होते.

न्यायालयीन कोठडी

पोलिसांनी याप्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून रघू प्रजापतीसह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे. मात्र सोमवारी उपचारादरम्यान बिंदूचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यांच्या कलमात वाढ केल्याचं पोलिसांनी सांगितलं. न्यायालयाने या तीन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा-

गॅस सिलेंडर नीट न लावल्यामुळे आगीचा भडका, चार गंभीर

लाईट बंद न केल्याने पत्नीची केली हत्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा