Advertisement

लाईट बंद न केल्याने पत्नीची केली हत्या


लाईट बंद न केल्याने पत्नीची केली हत्या
SHARES
Advertisement

रात्री लाईट बंद न केल्याच्या वादातून पतीनेच पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना शुक्रवारी रात्री शिवडीत घडली. लिपी शेख असं मृत महिलेचं नाव आहे. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी गुन्हा नोंदवत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.


रागाच्या भरात केली हत्या

मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी असलेले जोडपं शिवडीच्या दारूखाना परिसरात राहत होते. बिलाल करीम शेख (२६) हा आपल्या पत्नी आणि दोन मुलांसोबत रहात होता. मागील अनेक वर्षांपासून या दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून वारंवार खटके उडायचे. शुक्रवारी रात्री झोपताना लाईट बंद न केल्याने बिलालने लिपी यांना शिविगाळ केली. यातून दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यावेळी राग अनावर झालेल्या बिलालने लिपीला मारहाण करत तिची गळा आवळून हत्या केली. बिलालच्या मारहाणीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी बिलालच्या झोपडीकडे धाव घेतली. बेशुद्ध लिपीला स्थानिकांनी जे. जे. रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी लिपीला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी शिवडी पोलिसांनी लिपीची आई मुनीरा शेख हिच्या फिर्यादीवरून बिलाल विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.

संबंधित विषय
Advertisement