संदीप देशपांडे यांची जामीनावर सुटका

सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा खुली करावी अशी मागणी करत सोमवारी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह चार मनसे पदाधिकाऱ्यांनी लोकल प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन केलं होतं. याप्रकरणी कर्जत रेल्वे पोलिसांनी या चौघांनाही अटक केली होती. कल्याण रेल्वे न्यायालयाने चौघांना १४ दिवसांची कोठडी सुनावली. मात्र त्यानंतर देशपांडे यांच्या वकिलांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला. त्यावर न्यायालयाने चौघांचीही 15 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्‍यावर मुक्तता केली.

सर्वसामान्यांसाठीही लोकल सेवा खुली करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली होती. या मागणीकडे लक्ष राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी सोमवारी सकाळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह गजानन काळे, संतोष धुरी आणि अतुल भगत यांनी लोकलमधून प्रवास करत सविनय कायदेभंग केला.

या प्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह ४ जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. आंदोलनानंतर कर्जत लोहमार्ग पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला होता. विनातिकीट प्रवास करणे, दरवाजात लटकून प्रवास करणे, शासन आदेशाचे उल्लंघन करणे, असा ठपका या नेत्यांवर ठेवण्यात आला होता. 


हेही वाचा -

लक्षणं नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे पालिकेचे निर्देश, 'हे' आहे कारण

नवी मुंबईत महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत ५० टक्के वाढ


पुढील बातमी
इतर बातम्या