Advertisement

मनसे नेते संदीप देशपांडेंसह ४ जणांना अटक

सोमवारी सकाळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांनी लोकलमधून प्रवास करत सविनय कायदेभंग केला. या प्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह ४ जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडेंसह ४ जणांना अटक
SHARES

सर्वसामान्यांसाठीही लोकल सेवा खुली करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली होती. या मागणीकडे लक्ष राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मनसेनं सविनय कायदेभंग करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे सोमवारी सकाळी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह मनसे पदाधिकाऱ्यांनी लोकलमधून प्रवास करत सविनय कायदेभंग केला. या प्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह ४ जणांना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

रेल्वे सुरू करण्यासाठी सविनय कायदेभंग करत रेल्वे प्रवास केलेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे, संतोष धुरी, गजानन काळे आणि अतुल भगत यांना अटक करण्यात आली आहे. कर्जत चारफाटा येथे पोलिसांनी त्यांना अटक केली. यापूर्वी मनाई असताना लोकलमधून प्रवास केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

'लॉकडाउनमध्ये रेल्वे सेवा बंद आहे. मात्र बससेवा सुरु करण्यात आली आहे. बसमध्ये लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. लोकांना आपापल्या घरी पोहोचण्यासाठी ८ तासांचा कालावधी लागत आहे. कल्याण, डोंबिवली, पालघर या ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. सरकारला विनंती केली परंतु ते ऐकत नाहीत. त्यामुळे येत्या सोमवारी मनसेतर्फे सविनय कायदे भंग करत आम्ही रेल्वे प्रवास करणार आहे', असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आली होती. लॉकडाउनच्या सुरूवातीच्या टप्प्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सेवा सुरू करण्यात आली. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा