Advertisement

लक्षणं नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे पालिकेचे निर्देश, 'हे' आहे कारण

खासगी रुग्णालयांना अति-जोखमीच्या रूग्णांसाठी बेड मोकळे करण्यास सांगितले आहे. त्यासाठी covid 19 च्या सौम्य किंवा लक्षणं नसलेल्या रुग्णांना डिचार्ज करण्यास सांगितलं आहे.

लक्षणं नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे पालिकेचे निर्देश, 'हे' आहे कारण
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) शहरातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयांना निर्देश दिले आहेत की, प्रकृती गंभीर असणाऱ्या कोरोना रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध असणं आवश्यक आहे. खास करून वृद्ध आणि उच्च जोखीम असणाऱ्या रुग्णांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे.

पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं १९ सप्टेंबर रोजी पाठवलेल्या निर्देशानुसार, खासगी रुग्णालयांना अति-जोखमीच्या रूग्णांसाठी बेड मोकळे करण्यास सांगितले आहे. त्यासाठी covid 19 च्या सौम्य किंवा लक्षणं नसलेल्या रुग्णांना डिचार्ज करण्यास सांगितलं आहे.

जेणेकरून प्रकृती चिंताजनक असणाऱ्या रुग्णांना बेड्स उपलब्ध होऊ शकतील. आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर जास्त भार पडू नये म्हणून लक्षण नसलेल्या किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रूग्णांना होम क्वारंटाईन करण्यास सांगितलं आहे.

हेही वाचा : कोरोनाशी लढण्यापेक्षा, तो होवूच नये यासाठी दक्षता घेण्याची गरज- राजेश टोपे

महानगरपालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे म्हणाले की, “सर्व सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांना सूचना देण्यात आल्या आहेत. गरजू रूग्णांसाठी त्वरित बेडची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना प्रेवश दिला जाणार नाही. त्यानुसार विविध सार्वजनिक आणि खाजगी रुग्णालयात दाखल सर्व रुग्णांना तातडीनं सोडण्यात येईल.”

प्रशासनानं धोरणांमध्येही काही बदल केले आहेत. त्यानुसार, कोविड केअर सेंटरमधील सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना ३ दिवसांत ताप न आल्यास त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येईल. अशांची चाचणी केल्याशिवाय त्यांना सोडले जाऊ शकते. तर रूग्णांना प्रथम लक्षणं दिसल्यास त्यांच्यावर १० दिवस उपचार केले जातील.

नवीन निर्देशानुसार मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांनाही हेच लागू आहे. प्रशासनानं धोरणात असंही नमूद केलं आहे की, मध्यम लक्षणं असणाऱ्यांना ऑक्सिजन बेड द्यावा. त्यांना गेल्या तीन दिवसांत कोणताही ताप नसेल तर दहा दिवसांनी सोडले जाऊ शकते. झोपडपट्टी किंवा इतर दाट लोकवस्ती असलेल्या रहिवासी रूग्णांना कोविड केअर सेंटर २ हलवण्यात येईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.



हेही वाचा

मास्क न घालणाऱ्यांवर केडीएमसीचा बडगा, २ लाखांचा दंड वसूल

मुंबईत तब्बल 'इतक्या' इमारती टाळेबंद प्रतिबंधित

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा