Advertisement

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं लोकल सुरू होण्याची शक्यता फारच कमी

मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं लोकल सुरू होण्याची शक्यता फारच कमी
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळं वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर लोकल सेवा सुरू केल्यास रुग्णांच्या संख्येत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. अशावेळी सर्व गोष्टी व्यवस्थित पाहूनच रेल्वे सुरू करावी लागेल, असं स्पष्ट करत परिवहनमंत्री अनिल परब यांनी सोमवारी लोकलसेवा आणखी काही दिवस सुरू न होण्याचेच संकेत दिले आहेत.

मुंबईची लाइफ लाइन लोकल सेवा केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू आहे. त्यामुळं सर्वसामान्यांसाठी ही लोकल सेवा सुरू व्हावी यासाठी मनसेनं सोमवारी आंदोलन केलं. मात्र असं असलं तरी लोकल सेवा एवढ्यात सुरू होतील याबाबत चिन्ह दिसत नाही.

सर्व गोष्टींची काळजी करून रेल्वे खुली करावी लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे रेल्वे खुली केली, तर आणखी प्रादुर्भाव वाढेल. त्यामुळेच आम्ही लोकलसेवा टप्प्याने खुली करीत आहोत. आता रेल्वेच्या फेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत. याला आता कोणाला राजकीय स्वरूप द्यायचे असेल तर देऊ द्या, असं याबाबत अधिक माहिती देताना परिवहनमंत्री यांनी म्हटलं.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा