Advertisement

मास्क न घालणाऱ्यांवर केडीएमसीचा बडगा, २ लाखांचा दंड वसूल

सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रभागक्षेत्रात पाहणी करून मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांना समज देऊन त्यांच्यावर दंडनीय कारवाई केली आहे.

मास्क न घालणाऱ्यांवर केडीएमसीचा बडगा, २ लाखांचा दंड वसूल
SHARES

कल्याण डोंबिवली (kalyan dombivali) महापालिका (केडीएमसी) क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालणं महापालिकेने बंधनकारक केलं आहे. जे नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क परिधान करणार नाहीत त्यांच्याविरुध्द पोलिसांच्या मदतीने दंडनीय कारवाई करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.

मात्र, अनेक नागरिक मास्क घालत नसल्याचे आढळून आलं आहे. अशा नागरिकांवर महापालिकेने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. केडीएमसीने मास्क न घालणाऱ्या ४१४ नागरिकांकडून २ लाख ६ हजार ७०० रूपयांचा दंड वसूल केला आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील महापालिकेच्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रभागक्षेत्रात पाहणी करून मास्क परिधान न करणाऱ्या नागरिकांना समज देऊन त्यांच्यावर दंडनीय कारवाई केली आहे.

महापालिकेच्या ब प्रभाग क्षेत्रातील ५३ नागरिकांकडून रु.२६,५००, क प्रभाग क्षेत्रातील ७१ नागरिकांकडून रु.३५,५००, जे प्रभाग क्षेत्रातील ६६ नागरिकांकडून रु.३३०००, ड प्रभाग क्षेत्रातील ४२ नागरिकांकडून रु.२१००००, फ प्रभाग क्षेत्रातील ७४ नागरिकांकडून रु.३७,०००, तर ह प्रभाग क्षेत्रातील ८१ नागरिकांकडून रु.४० ,५००, आय प्रभाग क्षेत्रातील नागरिकांकडून रु.६०००, इ प्रभाग क्षेत्रातील १५ नागरिकांकडून रु.७२०० अशी एकूण रक्कम रुपये २,०६,७०० एवढी रक्कम दंड स्वरूपात मास्क न परिधान करणाऱ्या नागरिकांकडून वसूल करण्यात आली आहे. कोरोना साथीला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने ही मोहीम अशीच सुरू ठेवणेबाबतचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.



हेही वाचा -

मुंबईत तब्बल 'इतक्या' इमारती टाळेबंद प्रतिबंधित

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 'बेस्ट घेणार 'एसटी'ची मदत



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा