Advertisement

मुंबईत तब्बल 'इतक्या' इमारती 'सील'

मागील १५ दिवसांतच प्रतिबंधित इमारतींची संख्या ३ हजाराने वाढली आहे, तर मुंबईत सध्या तब्बल ९५०० इमारती टाळेबंद प्रतिबंधित आहेत.

मुंबईत तब्बल 'इतक्या' इमारती 'सील'
SHARES

मुंबईत मागील काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळं प्रतिबंधित इमारतींची संख्याही वाढू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील १५ दिवसांतच प्रतिबंधित इमारतींची संख्या ३ हजाराने वाढली आहे, तर मुंबईत सध्या तब्बल ९५०० इमारती टाळेबंद प्रतिबंधित आहेत.

मुंबईत मार्च महिन्यात कोरोनानं लरावेश केला. त्यावेळी नागरिकांच्या सुरक्षेसाठी इमारतीत एखादा रुग्ण सापडला तरी संपूर्ण इमारत प्रतिबंधित केली जात होती. मात्र याला मोठ्या प्रमाणावर विरोध होऊ लागल्यानंतर हे निर्बंध शिथिल करण्यात आले. त्यामुळे ज्या मजल्यावर रुग्ण आहे, तोच मजला किंवा एखादे घरच प्रतिबंधित केले जात होते. 

परंतु गेल्या आठवडय़ात पालिकेने पुन्हा एकदा प्रतिबंधित इमारतींबाबतच्या नियमावलीत बदल करत एखाद्या इमारतीत दहापेक्षा अधिक रुग्ण असल्यास किंवा दोन अथवा अधिक मजल्यांवर रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत टाळेबंद करण्याचे ठरविले. त्यामुळे संपूर्ण इमारती टाळेबंद होण्याचे प्रमाण वाढले आहे. ऑगस्टमध्ये रुग्णवाढीचा दर जसा कमी झाला, तसतसे प्रतिबंधित इमारतींची संख्याही कमी झाली होती. मात्र सप्टेंबरपासून ही संख्याही वाढू लागली आहे.

सध्या एकूण रुग्णांपैकी ८० टक्के इमारतीतील आहेत. मलबार हिल, नाना चौक यांसारख्या उच्चभ्रू विभागात एखाद्या गगनचुंबी इमारतीत फक्त एकाच मजल्यावर सात-आठ रुग्ण असतील तर तिथे संपूर्ण चाळीस मजल्यांची इमारत प्रतिबंधित करण्यापेक्षा एकच मजला प्रतिबंधित करता येतो; पण तेच पाच-सहा मजल्यांवर मिळून दहा रुग्ण असतील तर संपूर्ण इमारत प्रतिबंधित करणे आवश्यक बनते, असे मत डी. विभागाचे साहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी व्यक्त केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा