विलेपार्लेत माय-लेकीची गळफास लावून आत्महत्या

वयोवृद्ध आई (आणि तिच्या मुलीने ( गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना विलेपार्ले (Vile Parle) येथे घडली. मीना परांजपे (७३) आणि मंजिरी परांजपे (५३) असं या मायलेकींची नावं आहेत. त्यांच्या घरी काम करणारी बाई सकाळी आली तेव्हा ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस (याप्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

गुरूवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास या मायलेकींच्या घरी काम करणारी बाई आली. मात्र, बराच वेळ कुणीही दरवाजा उघडला नाही. अखेरीस तिने त्यांच्या नातेवाईकांना बोलावलं. नातेवाईकांनी तात्काळ तिथे धाव घेतली. त्यांनीही बराच वेळ दरवाजा ठोठावला. मात्र, दोघींपैकी कुणाचाच प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस नातेवाईकांनी नातेवाईकांनी पोलिसांना ( कळवलं. पोलिसांनीही तात्काळ त्या ठिकाणी धाव घेत घराचा दरवाजा तोडला. यावेळी दोघींनी गळफास घेतल्याचं दिसून आलं. 


हेही वाचा -

स्टिरॉईड घेणं बेतलं जीवावर, अतिसेवनाने तरूणाचा मृत्यू

ट्रकच्या धडकेनं कोसळला पुलाचा सांगाडा, २ जण गंभीर जखमी


पुढील बातमी
इतर बातम्या