अशोक चव्हाणांच्या अडचणीत वाढ, 'आदर्श' घोटाळ्याची ईडीकडून पुन्हा चौकशी

आदर्श घोटाळा उघडकीस आल्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागलेले काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. यामागचं कारण म्हणजे अंमलबजावणी संचलनालया(ED)ने या घोटाळ्याची पुन्हा एकदा चौकशी सुरू केली आहे.

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना काँग्रेसच्या नेत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. खासकरून नव्या सरकारमध्ये अशोक चव्हाण देखील मंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. या घोटाळ्याप्रकरणी त्यांची पुन्हा चौकशी झाल्यास विरोधकांकडून त्यांना आणि सरकारला देखील लक्ष्य करण्यात येऊ शकतं.

हेही वाचा-  म्हणून उद्धव ठाकरेंनी सोडलं ‘सामना’चं संपादकपद!

कुलाब्यातील मोक्याच्या जागी असलेल्या ३१ मजल्यांच्या आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेत राजकीय नेते, नोकरशहा आणि सुरक्षा विभागातील अधिकाऱ्यांचे फ्लॅट आहेत. ज्या जागेवर ही इमारत उभी राहिली ती जागा कारगील युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींच्या कल्याणकारी कामांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. परंतु त्यांना डावलून नियमबाह्य पद्धतीने इतरांना सभासदत्व देण्यात आलं होतं.

फेब्रुवारी २००२ मध्ये या मुख्यमंत्र्यांना मुंबईच्या मध्यवर्ती भागात सेवानिवृत्त व कामगारांसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची विनंती करण्यात आली तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. २०१० मध्ये हा घोटाळा उघडकीस आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला होता.

बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी या इमारतीत जाऊन काही फ्लॅटची मोजणी केली. गृहनिर्माण संस्थेविरोधात कारवाई करण्यासाठी मालमत्तेची मोजणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.  


हेही वाचा-

फडणवीस यांची विरोधीपक्ष नेतेपदी निवड

अजित पवारांची पुन्हा उपमुख्यमंत्रीपदी वर्णी



पुढील बातमी
इतर बातम्या