अंधेरीत कंत्राटदारावर गोळीबार

अंधेरीच्या सहार गावात एका कंत्राटदारावर पूर्ववैमन्यसातून गोळीबार करण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी विकास शर्मा नावाच्या आरोपीला अटक केली आहे. गोळीच्या आवाजाने झालेल्या धावपळीत एक महिला जखमी झाली असल्याची माहिती सहार पोलिसांनी दिली आहे.

पूर्ववैमनस्यातून गोळीबार

अंधेरी पूर्व परिसरात राहणारा अब्दुल हा बुधवारी सायंकाळी परिसरात वावरत असताना. पूर्ववैमनस्यातून विकासने देशी कट्ट्याने त्याच्यावर गोळी झाडली. सुदैवाने या हल्यात अब्दुल थोडक्यात बचावला. मात्र गोळीच्या आवाजाने झालेल्या धावपळीत एक महिला गंभीर जखमी झाली. पोलिस तपासात तक्रारदार दर्शन शेट्येने हा गोळीबार घडवून आणल्याचे बोलले जाते. दर्शन आणि अब्दुलमध्ये मागील अनेक दिवसांपासून वाद होते. त्यातूनच त्याने अब्दुलचा काटा काढण्याचे ठरवले. या प्रकरणी अंधेरी पोलिसात गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


हेही वाचा -

१९ जानेवारीपासून मध्य रेल्वेवरून धावणार 'राजधानी एक्सप्रेस'

बिल्डर अग्रवाल आत्महत्याप्रकरणी सहा जणांना अटक


पुढील बातमी
इतर बातम्या