Advertisement

बिल्डर अग्रवाल आत्महत्याप्रकरणी सहा जणांना अटक

गेल्या आठवड्यात बिल्डर संजय अग्रवाल यांनी स्वतवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी अखेर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

बिल्डर अग्रवाल आत्महत्याप्रकरणी सहा जणांना अटक
SHARES
Advertisement

गेल्या आठवड्यात बिल्डर संजय अग्रवाल यांनी स्वतवर गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी अखेर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. अग्रवाल यांनी मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई करत सहा जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले सहाही जण अग्रवाल यांच्या गृहप्रकल्पातील सदनिकाधारक आहेत.


मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या

संजोना समुहाचे संजय अग्रवाल चेंबुरच्या सिद्धी काॅलनी इथं आपल्या कुटुंबासोबत राहत होते. १३ दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या राहत्या घरी स्वतवर गोळ्या झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी चेंबुर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली. तर पुढे याप्रकरणाचा तपास करत असताना संजय अग्रवाल यांनी मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्यानुसार अधिक तपास केला असता संजय अग्रवाल यांच्याकडून घर खरेदी करणार्या सहा सदनिकाधारकांकडून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात होती. त्यामुळेच कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची तक्रार संजय अग्रवालचा मुलगा क्षितीज अग्रवाल यांनी दाखल केली.

तर संजय अग्रवाल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा, मानसिक त्रास दिल्याचा आणि खंडणी मागण्याच्या गुन्ह्याखाली सहा सदनिकाधारकांना अटक केली आहे. संजय व्होरा, जितेंद्र जैन, कल्पेश ठक्कर, सचिन ढोलकिया, राज विलास गडकरी आणि किशोर शहा अशी या सहा जणांची नाव आहेत.हेही वाचा -

भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून प्राणघातक शस्त्रे जप्त, वस्तुविक्रीच्या नावाखाली शस्त्रविक्री

माटुंग्यातील व्यावसायिकाला कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारे अटकेतसंबंधित विषय
Advertisement