भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून प्राणघातक शस्त्रे जप्त, वस्तुविक्रीच्या नावाखाली शस्त्रविक्री

डोंबिवलीतील एका भाजपा पदाधिकारी कशाप्रकारे फॅशनेबल वस्तुंच्या नावाखाली चक्क शस्त्रविक्री करत होता याचा पर्दाफाश अखेर कल्याण गुन्हे शाखेने केला आहे. तपस्या फॅशन हाऊसच्या नावाखाली चाकू, सुरे, तलवारी आणि बंदुका अशा प्राणघातक शस्त्रांची खुलेआम विक्री हा भाजपा पदाधिकारी करत होता.

भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून प्राणघातक शस्त्रे जप्त, वस्तुविक्रीच्या नावाखाली शस्त्रविक्री
SHARES

डोंबिवलीतील एका भाजपा पदाधिकारी कशाप्रकारे फॅशनेबल वस्तुंच्या नावाखाली चक्क शस्त्रविक्री करत होता याचा पर्दाफाश अखेर कल्याण गुन्हे शाखेने केला आहे. तपस्या फॅशन हाऊसच्या नावाखाली चाकू, सुरे, तलवारी आणि बंदुका अशा प्राणघातक शस्त्रांची खुलेआम विक्री हा भाजपा पदाधिकारी करत होता. यासंबंधीची माहिती मिळाल्यानंतर कल्याण गुन्हे शाखेने कारवाई करत तपस्या फॅशन हाऊस या दुकानात चाकू, सुरे, तलवारी, बंदुका अशी १७० प्राणघातक शस्त्रे जप्त करत या पदाधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.


१७० प्राणघातक शस्त्र जप्त

डोंबिवलीतील भाजपा पदाधिकारी धनंजय कुलकर्णी (४९) हे डोंबिवली शहराचे उपाध्यक्ष आहेत. डोंबिवलीतील महावीर नगरमध्ये धनंजय कुलकर्णी यांचं 'तपस्या फॅशन हाऊस' नावाचं दुकान आहे. या दुकानात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दुकानावर कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये ६२ स्टील तसंच पितळी धातूचे फायटर्स, ३८ बटण चाकू, २५ चॉपर्स, १० तलवारी, ९ कुकऱ्या, ९ गुप्त्या, ५ सुरे, ३ कुऱ्हाडी, १ कोयता आणि १ एयरगन असे एकूण १७० प्राणघातक शस्त्रे जप्त केली. मात्र, कुलकर्णी यांनी इतका मोठा शस्त्रसाठा आणला कुठून? तसंच, या प्राणघातक शस्त्रांची विक्री केली जाणार होती का? याचा तपास सध्या पोलिस करत आहे.


आधारवाडी तुरूंगात रवानगी

दरम्यान धनंजय कुलकर्णी याला अटक केल्यानंतर मंगळवारी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयानं त्याला पोलिस कोठडी सुनावली असून त्याची रवानगी आधारवाडी तुरुंगात करण्यात आली आहे. तर भाजपाकडून मात्र अजूनही यासंबंधीची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.



हेही वाचा - 

माटुंग्यातील व्यावसायिकाला कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारे अटकेत

नवव्या दिवशी अखेर तिढा सुटला, संप मागे, लवकरच अधिकृत घोषणा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा