Advertisement

नवव्या दिवशी अखेर तिढा सुटला, संप मागे, लवकरच अधिकृत घोषणा

गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या बेस्ट संप अखेर आता काही मिनिटांतच मागे घेतला जाणार आहे. संपाबाबतच्या मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान बेस्ट कर्मचार्यांनी तासाभरात संप मागे घेत असल्याची घोषणा करू अशी ग्वाही देत गेल्या नऊ दिवसांपासून बेहाल झालेल्या प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे.

नवव्या दिवशी अखेर तिढा सुटला, संप मागे, लवकरच अधिकृत घोषणा
SHARES

गेल्या नऊ दिवसांपासून सुरू असलेला बेस्ट संप अखेर आता काही मिनिटांतच मागे घेतला जाणार आहे. संपाबाबतच्या मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान बेस्ट कर्मचाऱ्यांनी तासाभरात संप मागे घेत असल्याची घोषणा करू अशी ग्वाही देत गेल्या नऊ दिवसांपासून बेहाल झालेल्या प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. त्यानुसार आता लवकरच संप मागे घेतल्याची अधिकृत घोषणा बेस्ट कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांच्याकडून केली जाणार आहे.
संपाविरोधात याचिका

बेस्ट संपाबाबत अॅड. दत्ता माने यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार उच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान न्यायालयानं अनेकदा बेस्ट कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आदेश दिले होते. तर उच्च स्तरीय समितीनंही संप मागे घ्या अन्यथा कारवाई करू असं म्हटलं होतं. पण त्यानंतरही कर्मचारी आपल्या मागण्यांवर, संपावर ठाम होते. त्यामुळं न्यायालयात प्रकरण जाऊन ही संप काही मिटत नव्हता.


संप मागे घेण्याची कर्मचार्यांची ग्वाही

बुधवारी अखेर न्यायालयानं संपावर तोडगा काढत गेल्या नऊ दिवसांपासूनच मोठा तिढा सोडवला आहे. संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नसल्याचं यावेळी राज्य सरकारकडून न्यायालयात सांगण्यात आलं. तर औद्योगिक लवादानं कामगारांसोबत ३ महिन्यांत अंतिम तडजोडी कराव्यात. त्यासंबंधीचा अहवाल तयार करावा आणि हा अहवाल न्यायालयात सादर करावा असेही आदेश न्यायालयानं दिले आहेत. तर दुसरीकडे बेस्ट कर्मचार्यांना दहा टप्प्यातील वेतनवाढ मान्य नसल्यानं उर्वरित १० टप्प्यांच्या मुद्यावर लावादानं एका महिन्यात अंतरिम अहवाल द्यावा असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. महत्त्वाचं म्हणजे बेस्ट कर्मचारी आणि बेस्ट प्रशासन यांच्यात मध्यस्थी करत कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी न्यायालयानं मध्यस्थही नेमला आहे.


प्रवाशांना दिलासा

न्यायालयातील या घडामोडीनंतर अखेर बेस्ट कर्मचाऱ्यांनी तासाभरात संप मागे घेऊ अशी ग्वाही न्यायालयात दिली. त्यामुळे आता बेस्टचा संप मागे घेण्यात आला असून आता केवळ त्याची अधिकृत घोषणा बाकी आहे. गेल्या नऊ दिवसांपासून मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन बंद असल्यानं चाकरमान्यांचे मोठे हाल होत होते. त्यांच्याकडून लवकरात लवकर संपावर तोडगा काढण्याची मागणी होत होती. त्यानुसार अखेर न्यायालयाला तोडगा काढण्यात यश आल्यानं आता मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.हेही वाचा -

बेस्टचा संप संपता संपेना! सलग नवव्या दिवशीही मुंबईकर वेठीस

राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, शिवस्मारकाचं काम बंदसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा