बेस्टचा संप संपता संपेना! सलग नवव्या दिवशीही मुंबईकर वेठीस

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा बुधवारी सलग नववा दिवस अाहे. मंगळवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी संप मिटेल अशी आशा होती. मात्र कोणताही तोडगा न निघाल्यामुळं मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

SHARE

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा बुधवारी सलग नववा दिवस अाहे. मंगळवारी उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणी वेळी संप मिटेल अशी आशा होती. मात्र कोणताही तोडगा न निघाल्यामुळं मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. दरम्यान, उच्च न्यायालयात या संपाबाबत बुधवारी ११ वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यानंतर संपाबाबत निर्णय होईल अशी आशा आता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मंगळवारी न्यायालयातील सुनावणीनंतर संपाबाबत भूमिका ठरवण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांची मतं जाणून घेण्यात आली असता, मागण्या मान्य होऊन लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप मागे घेण्याच्या भुमिकेवर कर्मचारी ठाम आहेत. त्यामुळं न्यायालयातील सुनावणी नंतर संप मिटणार का याकडं आता सर्वांचच लक्ष लागलं आहे.


विलीनीकरणाचा एकही मुद्दा नाही

मंगळवारी झालेल्या न्यायालयातील सुनावणीवेळी उच्चस्तरीय समितीचा अहवाल महाधिवक्ता अशुतोष कुंभकोणी यांनी सादर केला. मात्र, बेस्टचा अर्थसंकल्प पालिका अर्थसंकल्पात विलीन करण्याची कर्मचाऱ्यांची मुख्य मागणी असून या अहवालात विलीनीकरणाचा एकही मुद्दा नसल्याचे बेस्ट संयुक्त कृती समितीचे शशांक राव यांनी वडाळा कर्मचारी वसाहतीत झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बैठकीमध्ये सांगितले. तसंच, 'बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपात हस्तक्षेप करू नका आणि त्यांच्या पदरात काहीही देऊ नका, अशी सूचना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे', असा खळबळजनक आरोपही शशांक राव यांनी या बैठकीत केला.


संपाच्या भुमिकेवर ठाम

मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी रात्रीपर्यंत संप मागे घ्या आणि उद्या सकाळी त्याबाबत कोर्टाला माहिती द्या, असे तोंडी आदेश दिले होते. मात्र त्यानंतर देखील बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्यास नकार दिला आहे. तसंच, बेस्ट प्रशासनाकडून उच्च न्यायालयात देण्यात आलेल्या प्रस्तावावर बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीच्या बैठकीत सडकून टीका करण्यात आली. 'प्रशासनाने जो प्रस्ताव दिला आहे त्यामागे कामगार कपातीचा आणि बेस्टच्या खासगीकरणाचा छुपा डाव असल्याचा आरोप शशांक राव यांनी केला. त्याचप्रमाणं, एकप्रकारे हा 'डेथ वॉरंट'च असून आमच्या भावना आम्ही बुधवारी न्यायलयात मांडणार आहोत, असेही शशांक राव यांनी स्पष्ट केले.


संप मागे घेण्याची सुचना

दरम्यान, बेस्ट प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यापासून कामगारांना वेतनवाढ देताना अन्य सर्व मागण्यांबाबत वाटाघाटी करण्याची तयारी न्यायलयात दर्शवली. त्यामुळं न्यायालयानं कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याची सूचना केल्या. बेस्ट प्रशासनाकडून कामगारांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यानं आतातरी संपावर तोडगा निघणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.हेही वाचा -

संप काही मिटेना

आता बारकोड स्कॅन करुन थेट विमानानं प्रवास करता येणारसंबंधित विषय
ताज्या बातम्या