Advertisement

आता बारकोड स्कॅन करुन थेट विमानानं प्रवास करता येणार

आता प्रवासांना थेट मोबाईलद्वारे बोर्डिंग पासवरील बारकोड (क्युआर कोड) स्कॅन करता येणार आहे. दरम्यान अशा पद्घतीचा तंत्रज्ञानाचा वापर करणार मुंबई विमानतळ हे देशातील पहिलं विमानतळ ठरलं आहे.

आता बारकोड स्कॅन करुन थेट विमानानं प्रवास करता येणार
SHARES

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांचा प्रवास आता जलदगतीनं होणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सिक्युरिटी चेकदरम्यान बोर्डिंग पासवर शिक्का मारण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. कारण आता प्रवासांना थेट मोबाईलद्वारे बोर्डिंग पासवरील बारकोड (क्युआर कोड) स्कॅन करता येणार आहे. दरम्यान अशा पद्घतीचा तंत्रज्ञानाचा वापर करणार मुंबई विमानतळ हे देशातील पहिलं विमानतळ ठरलं आहे.


ताटकळण्याची गरज नाही

विमान प्रवास दरम्यान प्रवाशांना बोर्डिंग पास हा अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. याद्वारे प्रवाशांना विमानतळाच्या आत सोडण्यात येतं. मात्र या बोर्डिंग पासवर सीआयएसएम शिक्का घेण्यासाठी बरीच गर्दी असल्यानं प्रवाशांना ताटकळत उभ राहाव लागतं. त्यामुळं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणानं सोमवारी डिजीटल प्रवासाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


वेळ वाचणार

या निर्णयानुसार मुंबई विमानतळावरील प्रवाशांचा बोर्डिंग पासवर शिक्का मारण्यासाठी गर्दीत उभ न राहता, तुम्ही तात्काळ त्यावरील बारकोड (क्यूआर कोड) स्कॅन करून विमानतळावर प्रवेश करू शकता. विशेष म्हणजे या बोर्डिंग पास प्रिंट करण्याचीही तुम्हाला गरज लागणार नाही. यामुळं प्रवाशांना सिक्युरिटी चेकसाठी लागणारा वेळ वाचणार आहे. तसेच अशा पद्धतीचा तंत्रज्ञानाचा वापर करणार मुंबई विमानतळ देशातील पहिलं विमानतळ ठरणार आहे.



हेही वाचा -

तीळगुळ आईस्क्रिम खा आणि गोड गोड बोला

मुंबईकर आणि पर्यटकांनसाठी माहिम चौपाटीचे होणार सुशोभिकरण



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा