Advertisement

तीळगुळ आईस्क्रिम खा आणि गोड गोड बोला


तीळगुळ आईस्क्रिम खा आणि गोड गोड बोला
SHARES

नवीन वर्षातील पहिलाच सण म्हणजे मकर संक्रांत... संक्रांतीला गोडा-धोडाचे पदार्थ तर असतातच. तरीही मी तुम्हाला आज काही वेगळ्या पदार्थांची ओळख करून देणार आहे. दादरमधल्या आस्वाद हॉटेलमध्ये सध्या संक्रांत स्पेशल थाळी चाखण्याची संधी खवय्यांना मिळाली आहे.

संक्रांतीला अनेक कुटुंब घरातच जेवण करणं पसंत करतात. पण कधीतरी थोडासा बदल म्हणून तुम्ही संक्रांत थाळीचा आस्वाद घेऊ शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फक्त संक्रांतीच्या दिवशीच नाही तर पूर्ण आठवडा संक्रांत थाळीचा आस्वाद घेऊ शकता.


थाळीची खासियत

संक्रांत हा सण मुळात पौष महिन्यात साजरा केला जातो. पौष महिन्यात कडाक्याची थंडी असते. त्यामुळे अशा वातावरणात पौष्टीक पण शरीराला उब देणाऱ्या पदार्थांचं सेवन केलं जातं. आस्वाद तर्फे ठेवण्यात आलेल्या या थाळी मागचा हेतू देखील हाच आहे की, या माध्यमातून लोकांनी पौष्टीक आणि शरीराला उब देणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा.


ह्या  पदार्थांची मेजवानी

संक्रांत थाळीत तुम्हाला तीळ लावलेली ज्वारीची भाकरी, भोगीची भाजी, भोगीची खिचडी, कढी, तीळ साटोरी, गाजराची कोशिंबीर असे पदार्थ आहेत. यातील बहुतांश पदार्थांमध्ये तीळाचा अदिक समावेश असल्याचं तुम्हाला आढळेल. कारण तीळ हे उष्ण असतात. थंडीत त्याचं सेवन करणं चांगलं तर असतंच. शिवाय त्याच्या सेवनानं शरीराला उष्णता मिळते. हेच कारण आहे की संक्रांतीला प्रत्येक घरात तीळगुळ बनवले जातात.



तीळगुळ आईस्क्रिम

आता इतकं सर्व खाल्ल्यानंतर आपण आईस्क्रिम तर खातोच. आता इथं आईस्क्रिमला एक वेगळाच फ्लेवर देण्यात आला आहे. तीळगुळ आईस्क्रिम हा हटके प्रकार इथं तुम्हाला चाखता येणार आहे. संक्रांतील आपण तीळगुळ देऊन गोड गोड बोला असा संदेश देतो. पण हे आईस्क्रिम खाल्ल्यावर तीळगुळ आईस्किरम खा आणि गोड गोड बोला असं तुम्ही नक्कीच बोलाल.



हेही वाचा -

फ से फूड...




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा