मुंबईकर आणि पर्यटकांनसाठी माहिम चौपाटीचे होणार सुशोभिकरण

मुंबईतील माहिम चौपाटीवर आता लवकरच सुशोभिकरण करण्यात येणार आहे. कोळी संस्कृती, जिम, पार्किंग, मुलांसाठी खेळणी, स्वच्छ किनारा, आकर्षक रोषणाई आणि अद्ययावत सुविधा माहीमच्या चौपाटीवर लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहेत.

SHARE

चौपाटी म्हटलं की जुहू चौपाटी, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी अशा इन मीन तीन चौपाट्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. या चौपाट्या नेहमीच पर्यटकांना, मुंबईकरांना आकर्षित करतात. पण त्याचवेळी माहिम चौपाटी मात्र अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहेत. या चौपाटीचा चौपाटी म्हणून विकासच करण्यात न आल्यानं, इथं कोणत्याही सुविधा वा पर्यटकांना, मुंबईकरांना आकर्षित करणारं असं काहीही नसल्यानं माहिम चौपाटीची चौपाटी अशी ओळख झालेली पाहायला मिळत नाही. पण आता लवकरच माहिम चौपाटीही दादर, गिरगाव, जुहू चौपाटीप्रमाणं मुंबईकराचं-पर्यटकांचं आकर्षण बनणार आहे. कारण आता लवकरच माहिम चौपाटी कात टाकणार आहे. माहिम चौपाटीचं सुशोभिकरण मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात येणार आहे.

पालिकेच्या सुशोभिकरणाच्या प्रस्तावानुसार कोळी संस्कृती, जिम, पार्किंग, मुलांसाठी खेळणी, स्वच्छ किनारा, आकर्षक रोषणाई आणि अद्ययावत सुविधा माहीमच्या चौपाटीवर लवकरच उपलब्ध करण्यात येणार आहेत. माहिम चौपाटीच्या २.५ किमी भागात सुशोभीकरण करण्यात येणार असून त्यासाठी पालिका एक कोटी २६ लाख ८६ हजार रुपये खर्च करणार आहे.


विविध सुविधा करणार उपलब्ध

माहिम चौपाटी पर्यटक आणि मुंबईकरांसाठी आकर्षित करण्यासाठी किनाऱ्यावर विविध प्रकारची शोभेची झाडे, फुलझाडे लावण्यात येणार आहेत. पर्यटकांना बसण्यासाठी आरामदायी आसने बांधण्यात येणार आहेत. तर भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे सण-उत्सव साजरे करण्यासाठी प्रशस्त मोकळी जागा ठेवण्यात येणार आहे. तसंच या ठिकाणी पे-ऍण्ड पार्कची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेला उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल. त्याशिवाय उंचावरून मुंबईचा नजारा पाहण्यासाठी टॉवरही बनवण्यात येणार आहे.


कोळी संस्कृतीचे दर्शन

माहिम चौपाटी येथे कोळी बांधवांची मोठ्या प्रमाणात वस्ती असल्यामुळं सुशोभिकरणासाठी जुन्या बोटी, जाळी प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना आणि मुंबईकरांना कोळी संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. तसंच, किल्ल्याची ऐतिहासिक प्रतिकृतीही तयार करण्यात येईल.


दुर्लक्षित चौपाटी

मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा, मनोरी आणि गोराई या चौपाट्यांवर दररोज मुंबईकरांसह परदेशातील पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळं माहिम कॉजवे येथे असलेली माहिम चौपाटी दुर्लक्षित होत होती. त्यामुळं माहीम चौपाटीच्या सुशोभीकरणाचा निर्णय घेतला आहे.


हेही वाचा -

मांजा गळ्यात अडकून तरूणाचा मृत्यू

पारधी समाजाची कथा सांगणार 'पारधाड'संबंधित विषय
ताज्या बातम्या