Advertisement

पारधी समाजाची कथा सांगणार 'पारधाड'

आजवर बऱ्याच चित्रपटांनी विविध समाजातील बांधवांचं जीवन, परंपरा, संस्कृती रुपेरी पडद्यावर मांडण्याचं काम केलं आहे. मागील काही वर्षांपासून तळागाळातील काही समाजांच्या कथाही मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. ज्यामुळे त्यांची जीवनशैली जगासमोर येत आहे. आता 'पारधाड' या आगामी मराठी चित्रपटात पारधी समाजाची कथा पाहायला मिळणार आहे.

पारधी समाजाची कथा सांगणार 'पारधाड'
SHARES

आजवर बऱ्याच चित्रपटांनी विविध समाजातील बांधवांचं जीवन, परंपरा, संस्कृती रुपेरी पडद्यावर मांडण्याचं काम केलं आहे. मागील काही वर्षांपासून तळागाळातील काही समाजांच्या कथाही मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. ज्यामुळे त्यांची जीवनशैली जगासमोर येत आहे. आता 'पारधाड' या आगामी मराठी चित्रपटात पारधी समाजाची कथा पाहायला मिळणार आहे.


पोस्टर ट्रेलर लाँच

ज्ञानेश्वर भोसले दिग्दर्शित 'पारधाड' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पारधी समाजातील लोकांच्या उपस्थितीत नुकताच 'पारधाड' या सिनेमाचा पोस्टर ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. याप्रसंगी मेघराजराजे भोसले, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, गिरीश प्रभुणे, भिकूजी तथा दादा इदाते, पारधी आयोग, भारत सरकार, विजया भोसले, व्यवस्थापिका - भारत माता आदिवासी पारधी विध्यार्थी वसतिगृह, मोहोळ-सोलापूर, मीरा ताई फडणीस, स्वामी विवेकांनद आदिवासी छात्रवास, यवतमाळ आणि राजश्री काळे नगरसेविका, पुणे महानगरपालिका आदी मानव्यर उपस्थित होते.


ज्ञानेश्वर भोसलेंच्या आत्मचरित्रावर आधारित सिनेमा

फासे पारधी समाजाचं वास्तव आणि दाहकता या सिनेमात चित्रित करण्यात आली आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण या मूलभूत गरजांपाससून भटक्या आणि विमुक्त जाती कशा प्रकारे वंचित आहेत याचं चित्रण सिनेमात पाहायला मिळणार आहे. ज्ञानेश्वर भोसले यांच्या 'चौदा महिने तेरा दिवस' या आत्मचरित्रावरून हा सिनेमा बनवण्यात आला आहे. या सिनेमाची कथा, निर्मिती आणि दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी भोसले यांनीच सांभाळली आहे.


म्हणून सिनेमाचा घाट

गुन्हेगारीचा कलंक माथी घेऊन वर्षानुवर्षे रूढी परंपरेच्या ओझ्याखाली जगणाऱ्या समाजाला नवी दिशा देणारा हा सिनेमा असल्याचं सांगत भोसले म्हणाले की, गुन्हेगार ही ओळख वगळता या समाजातील लोकांना कोणत्याही प्रकारचं ओळख प्रमाणपत्र नाही. समाजाकडून, पोलिसांकडून अवहेलना आणि अत्याचार पाचवीला पुजलेला जो माझ्या कादंबरीत मावणार नाही. त्याची झळ आणि सत्यता सिनेमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशातून पारधाड सिनेमाची निर्मिती केली.

या सिनेमाची पटकथा, संवाद जहिरुद्दीन पठाण यांचे असून, छायांकन ए. रेहमान शेख यांचं आहे. धनंजय मांद्रेकर, संदेश जाधव, चेतना भट, कीर्ती चौधरी, मनोज टाकणे, दीपक चव्हाण, शीतल कलापुरे, सोनल आजगावक, निशा काळे आणि प्रदीप कोथमिरे आदी कलाकारांनी या सिनेमात अभिनय केला आहे. एप्रिल महिन्यात 'पारधाड' महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



हेही वाचा -

थुकरटवाडीत विशिकाच्या लग्नाचा निषेध!

मकरसंक्रात आणि मोदींची थापांची पतंगबाजी, राज ठाकरेंनी पुन्हा उडवली खिल्ली



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा