थुकरटवाडीत विशिकाच्या लग्नाचा निषेध!

'तुला पाहते रे' या मालिकेत विक्रांत आणि ईशा म्हणजेच विकिशाचा शाही विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. या मालिकेच्या प्रेमात असलेल्या प्रेक्षकांनी घरबसल्या या सोहळ्याचा आनंद लुटला असला तरी काही जण मात्र नाराज झाले आहेत.

  • थुकरटवाडीत विशिकाच्या लग्नाचा निषेध!
SHARE

'तुला पाहते रे' या मालिकेत विक्रांत आणि ईशा म्हणजेच विकिशाचा शाही विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला आहे. या मालिकेच्या प्रेमात असलेल्या प्रेक्षकांनी घरबसल्या या सोहळ्याचा आनंद लुटला असला तरी काही जण मात्र नाराज झाले आहेत. हे कलाकार या लग्नाचा निषेध करण्यासाठी थुकरटवाडीत जमले आहेत.


४०० भागांचा पल्ला पार

"कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे,'' असं म्हणत गेली चार वर्षे झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमाने ४०० भागांचा यशस्वी पल्ला पार केला आहे. आजवरच्या प्रवासात 'चला हवा येऊ द्या'मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला.बाॅलिवूडचे सेलिब्रिटी नाराज

४०० भागांनंतर या कार्यक्रमात 'होऊ दे व्हायरल' हे नवं पर्व प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. आगामी भागात थुकरटवाडीत अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री सई ताम्हणकर येणार आहेत. सुबोध भावे त्याचा आगामी चित्रपट 'एक निर्णय' आणि सई तिच्या 'डेट विथ सई' या वेबसिरीजच्या निमित्ताने थुकरट वाडीत येणार आहे. विक्रांत आणि ईशा यांचं शाही लग्न हा चर्चेचा विषय होता. त्या लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटीजना बोलावलं नाही म्हणून बॉलिवूडचे काही कलाकार निषेध व्यक्त करणार आहेत. सर्व बॉलिवूडचे कलाकार थुकरटवाडीत 'माझा वट्टा' या कार्यक्रमात येणार आहेत.हेही वाचा - 

श्रद्धाने केलं ‘बाहुबली’चं तोंड गोड!

नोकरदारांसाठी खुशखबर! ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न लवकरच करमुक्तसंबंधित विषय
ताज्या बातम्या